ताडदेवमध्ये मुंबईचा पहिला विद्यार्थी गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाणार
शहरातील पहिला विद्यार्थी गृहनिर्माण प्रकल्प (student housing project) राबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुंबईतील (mumbai) ताडदेव येथे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) (MHADA) च्या मालकीची कॉम्पॅक्ट स्टुडिओ अपार्टमेंट असलेली इमारत निवडली आहे.हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, राज्याच्या गृहनिर्माण विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंग यांनी सांगितले की, हा प्रकल्प महाराष्ट्राच्या नवीन गृहनिर्माण धोरणाचा एक भाग आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी, येत्या दोन आठवड्यांत हे जाहीर होईल.मुंबई, पुणे आणि नाशिक सारख्या शहरांतील विद्यार्थ्यांना भाडेतत्त्वावर “सुरक्षित अपार्टमेंट” प्रदान करणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच हे कामी आल्यास, राज्य सरकारची खाजगी विकासकांना जोडण्याची आणि त्यांना अतिरिक्त फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) आणि कमी प्रीमियम देण्यास प्रोत्साहित करण्याची योजना आहे.हेही वाचामरोळमध्ये अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्यात येणारमरीन ड्राइव्ह ते वांद्रे गाठा अवघ्या 12 मिनिटांत
Home महत्वाची बातमी ताडदेवमध्ये मुंबईचा पहिला विद्यार्थी गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाणार
ताडदेवमध्ये मुंबईचा पहिला विद्यार्थी गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाणार
शहरातील पहिला विद्यार्थी गृहनिर्माण प्रकल्प (student housing project) राबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुंबईतील (mumbai) ताडदेव येथे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) (MHADA) च्या मालकीची कॉम्पॅक्ट स्टुडिओ अपार्टमेंट असलेली इमारत निवडली आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, राज्याच्या गृहनिर्माण विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंग यांनी सांगितले की, हा प्रकल्प महाराष्ट्राच्या नवीन गृहनिर्माण धोरणाचा एक भाग आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी, येत्या दोन आठवड्यांत हे जाहीर होईल.
मुंबई, पुणे आणि नाशिक सारख्या शहरांतील विद्यार्थ्यांना भाडेतत्त्वावर “सुरक्षित अपार्टमेंट” प्रदान करणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच हे कामी आल्यास, राज्य सरकारची खाजगी विकासकांना जोडण्याची आणि त्यांना अतिरिक्त फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) आणि कमी प्रीमियम देण्यास प्रोत्साहित करण्याची योजना आहे.हेही वाचा
मरोळमध्ये अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्यात येणार
मरीन ड्राइव्ह ते वांद्रे गाठा अवघ्या 12 मिनिटांत