मुंबईच्या किमान तापमानात घट
भारतीय हवामान विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत मुंबईत 21 ते 22 अंश सेल्सिअस किमान तापमानासह (minimum temperature) रात्री थंड (winter) हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.बुधवारी, 13 नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईच्या (mumbai) उपनगरातील (mumbai weather) किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने रहिवाशांना हवेत गारवा जाणवू लागला आहे.याव्यतिरिक्त, हवामान (weather) तज्ञांनी असेही सूचित केले आहे की, वाऱ्याच्या दिशा बदलल्यामुळे दिवसाचे तापमान पुढील 4 ते 5 दिवसांत कमी होईल.IMD च्या माहितीनुसार, सांताक्रूझ वेधशाळेने 20.4 अंश सेल्सिअसचे तापमान नोंदवले, जे सामान्य तापमानापेक्षा 1.2 अंशांनी कमी होते. तसेच कुलाबा वेधशाळेने मंगळवारी आणि बुधवारी मध्यरात्री 23.5 अंश तापमान नोंदवले.दरम्यान, मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी शहर आणि उपनगरात कमाल तापमान 33-35 अंशांच्या दरम्यान होते. सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळेत किमान तापमान 21.4 आणि 23.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.अहवालानुसार, 2018 मध्ये नोव्हेंबरचा सर्वात उष्ण दिवस 37.6 अंश सेल्सिअस नोंदवला गेला होता आणि त्याच महिन्यातील सर्वात थंड रात्र 1950 मध्ये 13.3 अंश सेल्सिअस होती.हेही वाचाशिवाजी पार्क घेणार मोकळा श्वास!संदीप नाईक यांची पक्षातून हकालपट्टी
Home महत्वाची बातमी मुंबईच्या किमान तापमानात घट
मुंबईच्या किमान तापमानात घट
भारतीय हवामान विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत मुंबईत 21 ते 22 अंश सेल्सिअस किमान तापमानासह (minimum temperature) रात्री थंड (winter) हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.
बुधवारी, 13 नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईच्या (mumbai) उपनगरातील (mumbai weather) किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने रहिवाशांना हवेत गारवा जाणवू लागला आहे.
याव्यतिरिक्त, हवामान (weather) तज्ञांनी असेही सूचित केले आहे की, वाऱ्याच्या दिशा बदलल्यामुळे दिवसाचे तापमान पुढील 4 ते 5 दिवसांत कमी होईल.
IMD च्या माहितीनुसार, सांताक्रूझ वेधशाळेने 20.4 अंश सेल्सिअसचे तापमान नोंदवले, जे सामान्य तापमानापेक्षा 1.2 अंशांनी कमी होते. तसेच कुलाबा वेधशाळेने मंगळवारी आणि बुधवारी मध्यरात्री 23.5 अंश तापमान नोंदवले.
दरम्यान, मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी शहर आणि उपनगरात कमाल तापमान 33-35 अंशांच्या दरम्यान होते. सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळेत किमान तापमान 21.4 आणि 23.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
अहवालानुसार, 2018 मध्ये नोव्हेंबरचा सर्वात उष्ण दिवस 37.6 अंश सेल्सिअस नोंदवला गेला होता आणि त्याच महिन्यातील सर्वात थंड रात्र 1950 मध्ये 13.3 अंश सेल्सिअस होती.हेही वाचा
शिवाजी पार्क घेणार मोकळा श्वास!
संदीप नाईक यांची पक्षातून हकालपट्टी