मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत 3 दिवस यलो अलर्ट
येत्या चार ते पाच दिवसांत मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने रविवारी व्यक्त केली. यासोबतच कोकण विभागासाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.सलग तीन दिवस 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद केल्यानंतर मुंबईत शनिवार ते रविवार सकाळ या 24 तासांत 93 मिमी पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्याने विशेषत: मुंबई शहरासाठी पुढील तीन दिवसांसाठी “यलो अलर्ट” जारी केला आहे.शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी SDRF, जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका आणि नगरपालिकांनी नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सतर्क राहावे, अशा सूचना दिल्या आहेत.
Home महत्वाची बातमी मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत 3 दिवस यलो अलर्ट
मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत 3 दिवस यलो अलर्ट
येत्या चार ते पाच दिवसांत मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने रविवारी व्यक्त केली. यासोबतच कोकण विभागासाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सलग तीन दिवस 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद केल्यानंतर मुंबईत शनिवार ते रविवार सकाळ या 24 तासांत 93 मिमी पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्याने विशेषत: मुंबई शहरासाठी पुढील तीन दिवसांसाठी “यलो अलर्ट” जारी केला आहे.
शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी SDRF, जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका आणि नगरपालिकांनी नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सतर्क राहावे, अशा सूचना दिल्या आहेत.