मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता
मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पावसाने शहरात चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाणीकपात रद्द होणार?पाणीकपात रद्द करण्याबाबत आयुक्तांकडे जल विभागाची दोन दिवसांतच निर्णायक बैठक होणार (Mumbai Water Cut) आहे. दमदार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे तलाव अर्धे भरले आहेत. सध्या सात तलावांमध्ये मिळून सध्या 6,84,440 दशलक्ष लिटर पाणी जमा झाल्याचं समोर आलंय.धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊसजुलै महिना सुरू झाल्यापासून मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झालाय. त्यामुळे पाणीसाठ्यामध्ये वाढ झालीय. त्यामुळे मुंबई महानगर पालिका पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता (Mumbai Water Supply) आहे. मुंबई शहराला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, भातसा,आणि तुळशी या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. धरण क्षेत्रात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा सध्या उपलब्ध झालाय तरी देखील नागरिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याचं आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) करण्यात आलंय.मुंबईकरांवरील पाणीसावट दूर होणार?मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात मे महिन्यात झपाट्याने घट झाली होती. याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला (Mumbai News) होता. मुंबई महानगरामध्ये 30 मे 2024 पासून 5 टक्के पाणीकपात आणि 5 जून 2024 पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.हेही वाचामंगळवारसाठी ऑरेंज अलर्ट, 24 तासांत 200 मिमी पाऊस
मध्य महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी 24 जुलैपर्यंत रेड अलर्ट
Home महत्वाची बातमी मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता
मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता
मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पावसाने शहरात चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पाणीकपात रद्द होणार?
पाणीकपात रद्द करण्याबाबत आयुक्तांकडे जल विभागाची दोन दिवसांतच निर्णायक बैठक होणार (Mumbai Water Cut) आहे. दमदार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे तलाव अर्धे भरले आहेत. सध्या सात तलावांमध्ये मिळून सध्या 6,84,440 दशलक्ष लिटर पाणी जमा झाल्याचं समोर आलंय.
धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस
जुलै महिना सुरू झाल्यापासून मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झालाय. त्यामुळे पाणीसाठ्यामध्ये वाढ झालीय. त्यामुळे मुंबई महानगर पालिका पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता (Mumbai Water Supply) आहे.
मुंबई शहराला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, भातसा,आणि तुळशी या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. धरण क्षेत्रात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा सध्या उपलब्ध झालाय तरी देखील नागरिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याचं आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) करण्यात आलंय.
मुंबईकरांवरील पाणीसावट दूर होणार?
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात मे महिन्यात झपाट्याने घट झाली होती. याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला (Mumbai News) होता.
मुंबई महानगरामध्ये 30 मे 2024 पासून 5 टक्के पाणीकपात आणि 5 जून 2024 पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.हेही वाचा
मंगळवारसाठी ऑरेंज अलर्ट, 24 तासांत 200 मिमी पाऊसमध्य महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी 24 जुलैपर्यंत रेड अलर्ट