Mumbai Rains : मुंबईकरांनो लक्ष द्या! आज ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD)ने देखील काही ठिकाणी खूप मुसळधार पावसाच्या शक्यतेचा इशारा दिला आहे. तसेच 45-55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार. रहिवाशांना आवश्यक सावधगिरी बाळगण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पुढील काही दिवसांत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. दरम्यान, रायगड आणि रत्नागिरीला देखील वेगळ्या ठिकाणी, विशेषतः 24 जुलै रोजी अति मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.मुंबईत, IMD ने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, शहरात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. मंगळवार, 23 जुलै रोजी दुपारी 1:29 वाजता 4.69 मीटर इतकी मोठी भरती होती. 24 जुलै रोजी पहाटे 1:30 वाजता 4.07 मीटर इतकी मोठी भरती येऊन गेली. मिठी नदीची सध्याची पाण्याची पातळी 1.27 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. पावसाचा अंदाज पाहता मिठी नदीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.गेल्या 24 तासांत, 22 जुलै रोजी सकाळी 8:00 ते 23 जुलै रोजी सकाळी 8:00 पर्यंत, मुंबईमध्ये लक्षणीय पाऊस झाला. ज्यामध्ये शहरात सरासरी 59 मिमी, पूर्व उपनगरात 51 मिमी आणि पश्चिम उपनगरात 51 मिमी पावसाची नोंद झाली. हेही वाचामुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता
मध्य महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी 24 जुलैपर्यंत रेड अलर्ट
Home महत्वाची बातमी Mumbai Rains : मुंबईकरांनो लक्ष द्या! आज ऑरेंज अलर्ट जारी
Mumbai Rains : मुंबईकरांनो लक्ष द्या! आज ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD)ने देखील काही ठिकाणी खूप मुसळधार पावसाच्या शक्यतेचा इशारा दिला आहे. तसेच 45-55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार. रहिवाशांना आवश्यक सावधगिरी बाळगण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पुढील काही दिवसांत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.
दरम्यान, रायगड आणि रत्नागिरीला देखील वेगळ्या ठिकाणी, विशेषतः 24 जुलै रोजी अति मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत, IMD ने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, शहरात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.
मंगळवार, 23 जुलै रोजी दुपारी 1:29 वाजता 4.69 मीटर इतकी मोठी भरती होती. 24 जुलै रोजी पहाटे 1:30 वाजता 4.07 मीटर इतकी मोठी भरती येऊन गेली. मिठी नदीची सध्याची पाण्याची पातळी 1.27 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. पावसाचा अंदाज पाहता मिठी नदीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.
गेल्या 24 तासांत, 22 जुलै रोजी सकाळी 8:00 ते 23 जुलै रोजी सकाळी 8:00 पर्यंत, मुंबईमध्ये लक्षणीय पाऊस झाला. ज्यामध्ये शहरात सरासरी 59 मिमी, पूर्व उपनगरात 51 मिमी आणि पश्चिम उपनगरात 51 मिमी पावसाची नोंद झाली.हेही वाचा
मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यतामध्य महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी 24 जुलैपर्यंत रेड अलर्ट