विसर्जनासाठी वाहतुकीत बदल, पोलिसांचा कडक बंदोबस्त

विसर्जनासाठी मंगळवारी शहरात वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. काही मार्ग तात्पुरते बंद केले असून काही मार्ग हे एकतर्फी वाहतुकीसाठी खुले असणार आहेत. धोकादायक असलेल्या पुलावर बाप्पाची विसर्जन मिरवणूक थांबवता येणार नसल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बापाला निरोप देण्यासाठी भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. विसर्जन सोहळ्यात वाहतूक कोंडीचे प्रकार होऊ नयेत म्हणून वाहतूक पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पर्यायी मार्ग उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज रोडचा (कोस्टल रोड) वापर करावा. अटल सेतूकडून दक्षिण मुंबईत विलासराव देशमुख पूर्व मुक्त महामार्ग (फ्री वे) जाण्यासाठी पी डी’मेलो रोड-कल्पना जंक्शन येथून उजवे वळण घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – महापालिका मार्ग – मेट्रो येथून प्रिंसेस स्ट्रीट मार्गे कोस्टल रोडचा वापर करावा.नाथालाल पारेख मार्ग : भाई बंदरकर मार्गे ते इंदू क्लिनिक दोन्ही मार्ग बंद. पर्यायी मार्ग : कॉ. प्रकाश पेठे मार्ग येथून पांडे लेन जंक्शन. कॉ. प्रकाश पेठे मार्ग : संत गाडगे महाराज ते पांडे लेन चौक उत्तर वाहिनी बंद. नो पार्किंग या चारही मार्गांवर वाहने उभी करण्यास बंदी असेल. मरीन ड्राइव्ह येथील नेताजी सुभाषचंद्र मार्ग : एअर इंडिया जंक्शन ते मफतलाल जंक्शन दोन्ही वाहिनीवर पार्ंकगला मनाई असेल आझाद मैदान विभाग : सीएसएमटी जंक्शन येथून डी.एन. रोड, एल.टी. मार्ग अशी वळवण्यात आली आहे. काळबादेवी वाहतूक विभाग : अल्फ्रेड जंक्शन ते पोर्तुगीज चर्च हा रस्ता वाहतुकीस बंद राहील. कस्तुरबा गांधी चौक ते नित्यानंद हॉटेल जंक्शन हा रस्ता बंद असून पर्यायी मार्ग म्हणून काळबादेवी रोड व महर्षी कर्वे रोड येथून वाहतूक वळवण्यात येईल. घोडागाडी जंक्शन ते खत्तर गल्ली, चर्नी रोड स्थानक ते प्रार्थना समाज जंक्शन, गुलाल वाडी सर्पल ते सीपी टॅंक रस्ते बंद असतील. डी.बी. मार्ग वाहतूक विभाग : बँडस्टँड ते मफतलाल दोन्ही मार्गांवर वाहतूक बंद असेल. नवजीवन सर्पल ते एम पॉवेल रोड वाहतुकीस बंद. वाळकेश्वरचा रस्ता : तीन बत्ती जंक्शन ते बँडस्टँड एकेरी दिशा मार्ग असेल. केनेडी ब्रिज, ऑपेरा हाऊस जंक्शन, मराठे बंधू चौक ते नवजीवन जंक्शन, प्रार्थना समाज बाटा जंक्शन ते प्रार्थना समाज रोड इथे नो-पार्किंग असेल. नागपाडा वाहतूक विभाग : गुलाबराव गणाचार्य चौक ते खटाव मिल, सातरस्ता जंक्शन ते खडा पारशी जंक्शन, खडा पारशी जंक्शन ते नागपाडा जंक्शन, नागपाडा जंक्शन ते मुंबई सेंट्रल जंक्शन, शुक्लाजी स्ट्रीट ते दोन टाकी जंक्शन, वाहनांना बंदी असेल. गणपती विसर्जन दरम्यान आग्रीपाडा, नागपाडा, सातरस्ता जंक्शन, खडा पारशी, चिंचपोकळी, मुंबई सेंट्रल जंक्शन, दोन टाकी जंक्शन येथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हॅन चालकांनी लालबाग उडाणपूल, सर जे.जे. ब्रिज आणि कोस्टल रोडचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत. भायखळा वाहतूक विभाग : बावला कंपाउंड ते भारत माता जंक्शन उत्तर वाहिनी वाहतुकीस बंद असेल. चिंचपोकळी जंक्शन ते संत जगनाडे महाराज चौक येथे वाहतूक बंदी असेल. भोईवाडा वाहतूक विभाग : भोईवाडा नाका ते हिंदमाता जंक्शन बंद असेल. नायगाव क्रॉस ते सरफरे चौक, परेल जंक्शन ते खानोलकर मार्ग हा एकदिशा मार्ग असेल. हिंदमाता, भारतमाता, परळ जंक्शन येथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबईमधील 13 पुलांवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मध्य रेल्वे : घाटकोपर ओव्हर ब्रिज, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज पश्चिम रेल्वे : मरीन लाईन्स, सँडहस्ट,  ग्रँट रोड आणि चर्नी रोड दरम्यान फ्रेंच पूल, केनेडी ब्रिज, बेलासीस ब्रिज, महालक्ष्मी स्टील रेल ब्रिज, प्रभादेवी पॅरल रेल्वे ओव्हर ब्रिज, दादर टिळक ब्रिजवर विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. विसर्जन सोहळ्यात त्या ब्रिजवरून एकाच वेळी 100हून अधिक जण जाणार नाहीत याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. त्या पुलावर जास्त वेळ विसर्जन मिरवणुका थांबणार नाहीत.हेही वाचा खुशखबर! मेट्रो 3 चा पहिला टप्पा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होईल17-18 सप्टेंबरला 8 अतिरिक्त लोकल ट्रेन्स धावणार

विसर्जनासाठी वाहतुकीत बदल, पोलिसांचा कडक बंदोबस्त

विसर्जनासाठी मंगळवारी शहरात वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. काही मार्ग तात्पुरते बंद केले असून काही मार्ग हे एकतर्फी वाहतुकीसाठी खुले असणार आहेत. धोकादायक असलेल्या पुलावर बाप्पाची विसर्जन मिरवणूक थांबवता येणार नसल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बापाला निरोप देण्यासाठी भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. विसर्जन सोहळ्यात वाहतूक कोंडीचे प्रकार होऊ नयेत म्हणून वाहतूक पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.पर्यायी मार्गउत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज रोडचा (कोस्टल रोड) वापर करावा. अटल सेतूकडून दक्षिण मुंबईत विलासराव देशमुख पूर्व मुक्त महामार्ग (फ्री वे) जाण्यासाठी पी डी’मेलो रोड-कल्पना जंक्शन येथून उजवे वळण घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – महापालिका मार्ग – मेट्रो येथून प्रिंसेस स्ट्रीट मार्गे कोस्टल रोडचा वापर करावा.नाथालाल पारेख मार्ग : भाई बंदरकर मार्गे ते इंदू क्लिनिक दोन्ही मार्ग बंद.पर्यायी मार्ग : कॉ. प्रकाश पेठे मार्ग येथून पांडे लेन जंक्शन.कॉ. प्रकाश पेठे मार्ग : संत गाडगे महाराज ते पांडे लेन चौक उत्तर वाहिनी बंद.नो पार्किंगया चारही मार्गांवर वाहने उभी करण्यास बंदी असेल.मरीन ड्राइव्ह येथील नेताजी सुभाषचंद्र मार्ग : एअर इंडिया जंक्शन ते मफतलाल जंक्शन दोन्ही वाहिनीवर पार्ंकगला मनाई असेलआझाद मैदान विभाग : सीएसएमटी जंक्शन येथून डी.एन. रोड, एल.टी. मार्ग अशी वळवण्यात आली आहे.काळबादेवी वाहतूक विभाग : अल्फ्रेड जंक्शन ते पोर्तुगीज चर्च हा रस्ता वाहतुकीस बंद राहील.कस्तुरबा गांधी चौक ते नित्यानंद हॉटेल जंक्शन हा रस्ता बंद असून पर्यायी मार्ग म्हणून काळबादेवी रोड व महर्षी कर्वे रोड येथून वाहतूक वळवण्यात येईल.घोडागाडी जंक्शन ते खत्तर गल्ली, चर्नी रोड स्थानक ते प्रार्थना समाज जंक्शन, गुलाल वाडी सर्पल ते सीपी टॅंक रस्ते बंद असतील.डी.बी. मार्ग वाहतूक विभाग : बँडस्टँड ते मफतलाल दोन्ही मार्गांवर वाहतूक बंद असेल. नवजीवन सर्पल ते एम पॉवेल रोड वाहतुकीस बंद.वाळकेश्वरचा रस्ता : तीन बत्ती जंक्शन ते बँडस्टँड एकेरी दिशा मार्ग असेल. केनेडी ब्रिज, ऑपेरा हाऊस जंक्शन, मराठे बंधू चौक ते नवजीवन जंक्शन, प्रार्थना समाज बाटा जंक्शन ते प्रार्थना समाज रोड इथे नो-पार्किंग असेल.नागपाडा वाहतूक विभाग : गुलाबराव गणाचार्य चौक ते खटाव मिल, सातरस्ता जंक्शन ते खडा पारशी जंक्शन, खडा पारशी जंक्शन ते नागपाडा जंक्शन, नागपाडा जंक्शन ते मुंबई सेंट्रल जंक्शन, शुक्लाजी स्ट्रीट ते दोन टाकी जंक्शन, वाहनांना बंदी असेल.गणपती विसर्जन दरम्यान आग्रीपाडा, नागपाडा, सातरस्ता जंक्शन, खडा पारशी, चिंचपोकळी, मुंबई सेंट्रल जंक्शन, दोन टाकी जंक्शन येथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हॅन चालकांनी लालबाग उडाणपूल, सर जे.जे. ब्रिज आणि कोस्टल रोडचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.भायखळा वाहतूक विभाग : बावला कंपाउंड ते भारत माता जंक्शन उत्तर वाहिनी वाहतुकीस बंद असेल. चिंचपोकळी जंक्शन ते संत जगनाडे महाराज चौक येथे वाहतूक बंदी असेल.भोईवाडा वाहतूक विभाग : भोईवाडा नाका ते हिंदमाता जंक्शन बंद असेल. नायगाव क्रॉस ते सरफरे चौक, परेल जंक्शन ते खानोलकर मार्ग हा एकदिशा मार्ग असेल. हिंदमाता, भारतमाता, परळ जंक्शन येथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.मुंबईमधील 13 पुलांवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.मध्य रेल्वे : घाटकोपर ओव्हर ब्रिज, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिजपश्चिम रेल्वे : मरीन लाईन्स, सँडहस्ट,  ग्रँट रोड आणि चर्नी रोड दरम्यान फ्रेंच पूल, केनेडी ब्रिज, बेलासीस ब्रिज, महालक्ष्मी स्टील रेल ब्रिज, प्रभादेवी पॅरल रेल्वे ओव्हर ब्रिज, दादर टिळक ब्रिजवर विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. विसर्जन सोहळ्यात त्या ब्रिजवरून एकाच वेळी 100हून अधिक जण जाणार नाहीत याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. त्या पुलावर जास्त वेळ विसर्जन मिरवणुका थांबणार नाहीत.हेही वाचाखुशखबर! मेट्रो 3 चा पहिला टप्पा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होईल
17-18 सप्टेंबरला 8 अतिरिक्त लोकल ट्रेन्स धावणार

Go to Source