29 वर्षांनंतर दाऊदच्या साथीदाराला अटक
कुख्यात दाऊद इब्राहिम (dawood ibrahim) व छोटा शकील (chhota shakeel) टोळीतील गुंडाला 29 वर्षानंतर अटक करण्यात ना. म. जोशी मार्ग पोलिसांना यश आले आहे. आरोपी 1996 मध्ये हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार होता. आरोपी सध्या कर्नाटकात ओळख बदलून वास्तव्याला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.मुंबईमधील (mumbai) अर्थर रोड कारागृहात 1996 मध्ये दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड व छोटा राजन टोळीतील गुंड न्यायालयीन कोठडीत होते. दोन्ही टोळ्यांमधील (gang) गुंडांनी कारागृहात हाणामारी करून परस्परांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी कुख्यात गुंड (gangster) दाऊद इब्राहिम, छोटा शकील टोळीच्या गुंडांविरोधात ना. म. जोशी मार्ग (n m joshi marg) पोलीस ठाण्यात भादंवि कलम 143, 147, 148, 149, 324, 307 कलमांतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक आरोपी प्रकाश रतीलाल हिंगु (63) त्यावेळी अंधेरी येथील जुहू लेन परिसरात राहत होता. याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आरोपी न्यायालयीन प्रक्रियेसाठी गैरहजर राहू लागला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला फरार घोषित केले होते.फरार आरोपी कर्नाटकमधील हुबळी येथे वास्तव्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने व पथक हुबळीला रवाना झाले. तेथे त्यांनी फरार आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी ओळख पटताच आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला फेरअटक केली.हेही वाचामृत प्राण्यांच्या दफनभूमीला मंजुरीसुट्ट्या पैशांसाठी युपीआयचा पर्याय
Home महत्वाची बातमी 29 वर्षांनंतर दाऊदच्या साथीदाराला अटक
29 वर्षांनंतर दाऊदच्या साथीदाराला अटक
कुख्यात दाऊद इब्राहिम (dawood ibrahim) व छोटा शकील (chhota shakeel) टोळीतील गुंडाला 29 वर्षानंतर अटक करण्यात ना. म. जोशी मार्ग पोलिसांना यश आले आहे.
आरोपी 1996 मध्ये हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार होता. आरोपी सध्या कर्नाटकात ओळख बदलून वास्तव्याला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.मुंबईमधील (mumbai) अर्थर रोड कारागृहात 1996 मध्ये दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड व छोटा राजन टोळीतील गुंड न्यायालयीन कोठडीत होते. दोन्ही टोळ्यांमधील (gang) गुंडांनी कारागृहात हाणामारी करून परस्परांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
त्याप्रकरणी कुख्यात गुंड (gangster) दाऊद इब्राहिम, छोटा शकील टोळीच्या गुंडांविरोधात ना. म. जोशी मार्ग (n m joshi marg) पोलीस ठाण्यात भादंवि कलम 143, 147, 148, 149, 324, 307 कलमांतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अटक आरोपी प्रकाश रतीलाल हिंगु (63) त्यावेळी अंधेरी येथील जुहू लेन परिसरात राहत होता. याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आरोपी न्यायालयीन प्रक्रियेसाठी गैरहजर राहू लागला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला फरार घोषित केले होते.फरार आरोपी कर्नाटकमधील हुबळी येथे वास्तव्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने व पथक हुबळीला रवाना झाले. तेथे त्यांनी फरार आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी ओळख पटताच आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला फेरअटक केली.हेही वाचा
मृत प्राण्यांच्या दफनभूमीला मंजुरी
सुट्ट्या पैशांसाठी युपीआयचा पर्याय