ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक
1 एप्रिल राज्यातील ‘महावितरण’च्या सर्व वीजग्राहकांना वीजदरवाढीचा ‘शॉक’ सहन करावा लागणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, ‘महावितरण’च्या वीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. ‘महावितरण’ने गेल्या वर्षी सादर केलेली वीजदरवाढीची याचिका राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केली. त्यानुसार वीजदरात सरासरी 21.65 टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा वीजग्राहकांच्या संघटनांनी केला होता. त्यापैकी गेल्या आर्थिक वर्षांत (2023-24) वीजबिलात सरासरी 7.25 टक्के, तर या आर्थिक वर्षांत (2024-25) वीजबिलात 7.50 टक्के अशी एकूण सरासरी 14.75 टक्के वाढ झाली आहे. स्थिर आकारातही गेल्या वर्षी 10 आणि यंदाच्या वर्षी 10 अशी 20 टक्के वाढ झाल्याचे वीजग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. घरगुतीसह व्यापारी, शेतकरी, उद्योग अशा सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना हा वीजदरवाढीचा झटका बसणार आहे.वीजवापर (युनिट्स) 2023-24 चे प्रति युनिट दर (वीज आकार + वहन आकार) 2024-25 चे नवीन प्रति युनिट दर (वीज आकार + वहन आकार)
0ते 100 5.58 रुपये5.88 रुपये101 ते 300 10.81 रुपये11.46 रुपये301 ते 50014.78 रुपये15.72 रुपये501 ते 100016.74 रुपये17.81 रुपये
हेही वाचाLPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात
मुंबई-नाशिक, शिर्डी, पुणे मार्गांवरील शेअर टॅक्सीच्या भाड्यात वाढ
Home महत्वाची बातमी ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक
ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक
1 एप्रिल राज्यातील ‘महावितरण’च्या सर्व वीजग्राहकांना वीजदरवाढीचा ‘शॉक’ सहन करावा लागणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, ‘महावितरण’च्या वीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे.
‘महावितरण’ने गेल्या वर्षी सादर केलेली वीजदरवाढीची याचिका राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केली. त्यानुसार वीजदरात सरासरी 21.65 टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा वीजग्राहकांच्या संघटनांनी केला होता. त्यापैकी गेल्या आर्थिक वर्षांत (2023-24) वीजबिलात सरासरी 7.25 टक्के, तर या आर्थिक वर्षांत (2024-25) वीजबिलात 7.50 टक्के अशी एकूण सरासरी 14.75 टक्के वाढ झाली आहे.
स्थिर आकारातही गेल्या वर्षी 10 आणि यंदाच्या वर्षी 10 अशी 20 टक्के वाढ झाल्याचे वीजग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. घरगुतीसह व्यापारी, शेतकरी, उद्योग अशा सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना हा वीजदरवाढीचा झटका बसणार आहे.वीजवापर (युनिट्स)
2023-24 चे प्रति युनिट दर (वीज आकार + वहन आकार)
2024-25 चे नवीन प्रति युनिट दर (वीज आकार + वहन आकार)0ते 100
5.58 रुपये
5.88 रुपये101 ते 300
10.81 रुपये
11.46 रुपये301 ते 500
14.78 रुपये
15.72 रुपये501 ते 1000
16.74 रुपये
17.81 रुपयेहेही वाचा
LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपातमुंबई-नाशिक, शिर्डी, पुणे मार्गांवरील शेअर टॅक्सीच्या भाड्यात वाढ