मलबार हिल वॉकवेसाठी ऑनलाइन तिकीट विक्री सुरू होणार

BMC मलबार हिल एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवेसाठी ऑनलाइन तिकीट विक्री सुरू करण्याची तयारी करत आहे. तिकिट काढण्यासाठी होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. प्रवेश शुल्काची रचना अद्याप अंतिम केली गेली नाही. या महिन्यात हा वॉकवे पर्यटकांसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे. 482 मीटर लांबी आणि 2.4 मीटर रुंदीचा, शहराचा पहिला एलिव्हेटेड वॉकवे आहे. मलबार हिलच्या झाडीतून हा वॉकवे तयार करण्यात आला आहे. या वॉकवे वरुन गिरगाव चौपाटीचे दर्शनही होणार आहे. मलबार हिलच्या कमला नेहरू पार्कपासून सुरू होऊन डूंगरवाडी इथपर्यंत हा वॉकवे जाणार आहे.  या वॉकवेवरुन चालताना मुंबईकरांना निसर्गरम्य सौंदर्य व समुद्राची गाज एकता येणार आहे. सिंगापूरच्या जंगलातील प्रसिद्ध एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवेची प्रेरणा घेऊन हा वॉकवे बांधण्यात येणार आहे. “वॉक वे वरून एकावेळी केवळ 400 अभ्यागतांना सामावून घेता येत असल्याने, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय आवश्यक आहेत. त्यासाठी आम्ही पर्यटकांना नियुक्त वेळेसह एक ऑनलाइन तिकीट प्रणाली लागू करू. एकदा 400-प्रवेश क्षमता गाठली की, गेट बंद केला जाईल,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले, “प्रवेश शुल्क असले तरी ते नाममात्र असेल. वॉकवेच्या उद्घाटनाच्या नेमक्या तारखा येत्या काही दिवसांत निश्चित केल्या जातील.” वॉक वे वर खाद्यपदार्थ नेण्यावर बंधने घालण्यात येणार आहेत, कारण त्यामुळे माकडे आकर्षित होऊ शकतात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पर्यटकांना फक्त पाण्याच्या बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी असेल. 25 कोटी रुपये खर्चून वॉक वे तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या निविदा 2021 मध्ये देण्यात आल्या होत्या. या वॉक वेवरुन चालताना मुंबईकरांना वेगळा अनुभव घेता येणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही झाडांना हानी न पोहोचवता हा वॉकवे तयार करण्यात आला आहे.हेही वाचा मध्य रेल्वेच्या 6 स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट बंदअर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेच्या हप्त्यात वाढ नाही

मलबार हिल वॉकवेसाठी ऑनलाइन तिकीट विक्री सुरू होणार

BMC मलबार हिल एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवेसाठी ऑनलाइन तिकीट विक्री सुरू करण्याची तयारी करत आहे. तिकिट काढण्यासाठी होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. प्रवेश शुल्काची रचना अद्याप अंतिम केली गेली नाही. या महिन्यात हा वॉकवे पर्यटकांसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे.482 मीटर लांबी आणि 2.4 मीटर रुंदीचा, शहराचा पहिला एलिव्हेटेड वॉकवे आहे. मलबार हिलच्या झाडीतून हा वॉकवे तयार करण्यात आला आहे. या वॉकवे वरुन गिरगाव चौपाटीचे दर्शनही होणार आहे. मलबार हिलच्या कमला नेहरू पार्कपासून सुरू होऊन डूंगरवाडी इथपर्यंत हा वॉकवे जाणार आहे. या वॉकवेवरुन चालताना मुंबईकरांना निसर्गरम्य सौंदर्य व समुद्राची गाज एकता येणार आहे. सिंगापूरच्या जंगलातील प्रसिद्ध एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवेची प्रेरणा घेऊन हा वॉकवे बांधण्यात येणार आहे.”वॉक वे वरून एकावेळी केवळ 400 अभ्यागतांना सामावून घेता येत असल्याने, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय आवश्यक आहेत. त्यासाठी आम्ही पर्यटकांना नियुक्त वेळेसह एक ऑनलाइन तिकीट प्रणाली लागू करू. एकदा 400-प्रवेश क्षमता गाठली की, गेट बंद केला जाईल,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले, “प्रवेश शुल्क असले तरी ते नाममात्र असेल. वॉकवेच्या उद्घाटनाच्या नेमक्या तारखा येत्या काही दिवसांत निश्चित केल्या जातील.”वॉक वे वर खाद्यपदार्थ नेण्यावर बंधने घालण्यात येणार आहेत, कारण त्यामुळे माकडे आकर्षित होऊ शकतात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पर्यटकांना फक्त पाण्याच्या बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी असेल. 25 कोटी रुपये खर्चून वॉक वे तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या निविदा 2021 मध्ये देण्यात आल्या होत्या.या वॉक वेवरुन चालताना मुंबईकरांना वेगळा अनुभव घेता येणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही झाडांना हानी न पोहोचवता हा वॉकवे तयार करण्यात आला आहे.हेही वाचामध्य रेल्वेच्या 6 स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद
अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेच्या हप्त्यात वाढ नाही

Go to Source