बेस्टकडून बसपास योजनेच्या दरांमध्ये वाढ
बेस्ट उपक्रमाच्या बससेवेत सध्या सुरु असलेल्या बसपास योजनेत बदल करण्यात आले आहेत. 7 एप्रिल 2023 पासून सुरू असलेल्या योजनेत बदल करण्यात आलेले आहेत. सध्या लागू असलेल्या बसपास योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून सुधारित बसपास योजनेत दरवाढ करण्यात आलेली आहे. नव्या योजनेची अंमलबजावणी शुक्रवारी 1 मार्चपासून करण्यात येईल.सुधारित बसपास योजनेमध्ये एकूण 42 ऐवजी 18 बसपास करण्यात आलेले आहेत. सदर बसपास 6, 13, 19 तसेच 25 पर्यंतच्या विद्यमान वातानुकूलित व विनावातानुकूलित प्रवासभाडयाच्या अनुषंगाने साप्ताहिक आणि मासिक स्वरुपात उपलब्ध करण्यात आलेले आहेत. तसेच अमर्याद बसप्रवासाकरीता दैनंदिन 60 रुपये आणि मासिक 900 रुपये मुल्यवर्गाचे बसपास उपलब्ध आहेत.संपूर्ण बसप्रवर्तनाकरीता असलेल्या बसपासचे मुल्य 750 रुपयांऐवजी 900 रुपये करण्यात आलेले आहे. या बसपासचा कालावधी 30 दिवसांचा असून अमर्याद बसफेऱ्यांची सुविधा कायम ठेवण्यात आलेली आहे. दैनंदिन बसपास 50 ऐवजी 60 रुपये करण्यात आलेला असून अमर्याद प्रवासाची सुविधा कायम ठेवण्यात आलेली आहे.
विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 200 मुल्यवर्गाचा मासिक बसपास उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या बसपासच्या सहाय्याने अमर्याद बसफेऱ्यांची सुविधा देण्यात आलेली आहे. या बसपासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.बसपास योजनेमधील सर्व बसपास ‘बेस्ट चलो अॅप’ अथवा ‘बेस्ट’ उपक्रमाने उपलब्ध केलेल्या विविध ‘स्मार्टकार्ड’च्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक बसपासमध्ये 50 रुपयांची सवलत कायम ठेवण्यात आलेली आहे. साप्ताहिक बसपासमध्ये कोणतीही सवलत नाही. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गणवेशधारक विद्यार्थ्यांना तसेच 40 टक्के व त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांच्या मोफत प्रवासाच्या बसपासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हेही वाचाउत्तन-भाईंदर बससेवा भाईंदर जेट्टीपर्यंत वाढवण्याची मागणी
वांद्रे मेट्रो लाईनखाली ‘बॉलीवूड थीम’ साकारण्यात येणार
Home महत्वाची बातमी बेस्टकडून बसपास योजनेच्या दरांमध्ये वाढ
बेस्टकडून बसपास योजनेच्या दरांमध्ये वाढ
बेस्ट उपक्रमाच्या बससेवेत सध्या सुरु असलेल्या बसपास योजनेत बदल करण्यात आले आहेत. 7 एप्रिल 2023 पासून सुरू असलेल्या योजनेत बदल करण्यात आलेले आहेत. सध्या लागू असलेल्या बसपास योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून सुधारित बसपास योजनेत दरवाढ करण्यात आलेली आहे. नव्या योजनेची अंमलबजावणी शुक्रवारी 1 मार्चपासून करण्यात येईल.
सुधारित बसपास योजनेमध्ये एकूण 42 ऐवजी 18 बसपास करण्यात आलेले आहेत. सदर बसपास 6, 13, 19 तसेच 25 पर्यंतच्या विद्यमान वातानुकूलित व विनावातानुकूलित प्रवासभाडयाच्या अनुषंगाने साप्ताहिक आणि मासिक स्वरुपात उपलब्ध करण्यात आलेले आहेत. तसेच अमर्याद बसप्रवासाकरीता दैनंदिन 60 रुपये आणि मासिक 900 रुपये मुल्यवर्गाचे बसपास उपलब्ध आहेत.
संपूर्ण बसप्रवर्तनाकरीता असलेल्या बसपासचे मुल्य 750 रुपयांऐवजी 900 रुपये करण्यात आलेले आहे. या बसपासचा कालावधी 30 दिवसांचा असून अमर्याद बसफेऱ्यांची सुविधा कायम ठेवण्यात आलेली आहे. दैनंदिन बसपास 50 ऐवजी 60 रुपये करण्यात आलेला असून अमर्याद प्रवासाची सुविधा कायम ठेवण्यात आलेली आहे.विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 200 मुल्यवर्गाचा मासिक बसपास उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या बसपासच्या सहाय्याने अमर्याद बसफेऱ्यांची सुविधा देण्यात आलेली आहे. या बसपासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
बसपास योजनेमधील सर्व बसपास ‘बेस्ट चलो अॅप’ अथवा ‘बेस्ट’ उपक्रमाने उपलब्ध केलेल्या विविध ‘स्मार्टकार्ड’च्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक बसपासमध्ये 50 रुपयांची सवलत कायम ठेवण्यात आलेली आहे. साप्ताहिक बसपासमध्ये कोणतीही सवलत नाही. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गणवेशधारक विद्यार्थ्यांना तसेच 40 टक्के व त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांच्या मोफत प्रवासाच्या बसपासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.हेही वाचा
उत्तन-भाईंदर बससेवा भाईंदर जेट्टीपर्यंत वाढवण्याची मागणीवांद्रे मेट्रो लाईनखाली ‘बॉलीवूड थीम’ साकारण्यात येणार