मुंबईतील खड्ड्यांच्या समस्येविरोधात हटके आंदोलन

पावसाळा आणि खड्डे हे समीकरण काही नवीन नाही. पावसाळा आला की खड्ड्यांची समस्या वाढते. खड्डेमय रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. वॉचडॉग फाउंडेशनचे सदस्यांनी 22 जुलैला खड्ड्यांच्या समस्येविरोधात रस्त्यावर उतरून निषेध केला. सहारच्या शेजारी असलेल्या वेलंकणी ग्रोटो चौकात जमलेल्या फाउंडेशनच्या सदस्यांनी “माझा लडका खड्डा” असे लिहिलेले टी-शर्ट परिधान केले होते. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी जबाबदार ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्यावर मोक्का अंतर्गत कडक कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.  राज्य सरकारने नुकतेच माझी लाडकी बहिन आणि माझा लाडका भाऊ अशा योजना राबवल्या. याच योजनेच्या धर्तीवर वॉचडॉग फाऊंडेशनने “माझा लडका खड्डा”चे टीशर्ट घालत विरोध केला.  मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि महापालिका आयुक्तांना वारंवार आवाहन करूनही खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष देण्यास बीएमसी अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. “मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे हे दुसरे तिसरे काही नसून बीएमसीचे भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांना फायदा करून देणारा एक मोठा घोटाळा आहे. दरवर्षी खड्ड्यांवर खर्च होणारी रक्कम वाढत जाते, तरीही रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. या गोंधळाला राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे. निषेध करून, सार्वजनिक निधीच्या महत्त्वपूर्ण गैरवापराकडे लक्ष वेधण्याचा आमचा उद्देश होता”, असे फाऊंडेशनच्या सदस्यांनी एका वृत्तपत्राला सांगितले.   वॉचडॉग फाऊंडेशनने खड्ड्यांचे चित्र असलेले खास टी-शर्टचे वाटप केले. याव्यतिरिक्त, आंदोलकांनी रस्त्याच्या योग्य देखभालीच्या अभावावर लक्ष वेधून आरसीसी सिमेंटच्या मदतीने खड्डे भरले.हेही वाचा मुंबई : एका आठवड्यात वेबसाइटवर कुत्र्यांबाबत 150 तक्रारीमुंबईत खड्ड्यांच्या 6,000 हून अधिक तक्रारींची नोंद

मुंबईतील खड्ड्यांच्या समस्येविरोधात हटके आंदोलन

पावसाळा आणि खड्डे हे समीकरण काही नवीन नाही. पावसाळा आला की खड्ड्यांची समस्या वाढते. खड्डेमय रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. वॉचडॉग फाउंडेशनचे सदस्यांनी 22 जुलैला खड्ड्यांच्या समस्येविरोधात रस्त्यावर उतरून निषेध केला.सहारच्या शेजारी असलेल्या वेलंकणी ग्रोटो चौकात जमलेल्या फाउंडेशनच्या सदस्यांनी “माझा लडका खड्डा” असे लिहिलेले टी-शर्ट परिधान केले होते. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी जबाबदार ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्यावर मोक्का अंतर्गत कडक कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.  राज्य सरकारने नुकतेच माझी लाडकी बहिन आणि माझा लाडका भाऊ अशा योजना राबवल्या. याच योजनेच्या धर्तीवर वॉचडॉग फाऊंडेशनने “माझा लडका खड्डा”चे टीशर्ट घालत विरोध केला.  मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि महापालिका आयुक्तांना वारंवार आवाहन करूनही खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष देण्यास बीएमसी अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.”मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे हे दुसरे तिसरे काही नसून बीएमसीचे भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांना फायदा करून देणारा एक मोठा घोटाळा आहे. दरवर्षी खड्ड्यांवर खर्च होणारी रक्कम वाढत जाते, तरीही रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. या गोंधळाला राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे. निषेध करून, सार्वजनिक निधीच्या महत्त्वपूर्ण गैरवापराकडे लक्ष वेधण्याचा आमचा उद्देश होता”, असे फाऊंडेशनच्या सदस्यांनी एका वृत्तपत्राला सांगितले.  वॉचडॉग फाऊंडेशनने खड्ड्यांचे चित्र असलेले खास टी-शर्टचे वाटप केले. याव्यतिरिक्त, आंदोलकांनी रस्त्याच्या योग्य देखभालीच्या अभावावर लक्ष वेधून आरसीसी सिमेंटच्या मदतीने खड्डे भरले.हेही वाचामुंबई : एका आठवड्यात वेबसाइटवर कुत्र्यांबाबत 150 तक्रारी
मुंबईत खड्ड्यांच्या 6,000 हून अधिक तक्रारींची नोंद

Go to Source