वरळीनंतर मालाडमध्ये भीषण अपघात, महिलेचा मृत्यू

मुंबईत पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. मालाड परिसरात एका कारने महिलेला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की कारचालकाने महिलेला दूर फरफटत नेलं. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अपघाताचा हा थरार घडला. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे. त्याच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार अस्लम शेख यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावरच हा अपघात झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय 27 वर्ष असून ती मेहंदी क्लाससाठी गेली होती. मंगळवारी रात्री उशिरा घरी परतत असताना अचानक सुसाट वेगात कार आली. या कारने महिलेला जोरदार धडक दिली. इतकंच नाही तर तिला दूर फरफटतही नेलं. या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर स्थानिकांनी आधी कारचालकाला चोप दिला. मात्र, त्यानंतर जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचाराआधीच महिलेचा मृत्यू झाला. कारचालक हा मर्चंट नेव्हीमध्ये सेवेला असून स्थानिकांच्या मारहाणीत तो देखील जखमी झाला आहे. याप्रकरणी कारचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दोन दिवसांपूर्वी वरळी परिसरात बेस्ट बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या 9 जणांना चिरडलं होतं. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर 8 जण गंभीर जखमी झाले होते.हेही वाचा मुंबईत 48 तासांत 21 हून अधिक पोक्सो गुन्ह्यांची नोंदपोलिसांच्या हातून निसटून तरूणाची ट्रेनमधून उडी

वरळीनंतर मालाडमध्ये भीषण अपघात, महिलेचा मृत्यू

मुंबईत पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. मालाड परिसरात एका कारने महिलेला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की कारचालकाने महिलेला दूर फरफटत नेलं. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अपघाताचा हा थरार घडला. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे. त्याच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार अस्लम शेख यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावरच हा अपघात झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय 27 वर्ष असून ती मेहंदी क्लाससाठी गेली होती. मंगळवारी रात्री उशिरा घरी परतत असताना अचानक सुसाट वेगात कार आली. या कारने महिलेला जोरदार धडक दिली. इतकंच नाही तर तिला दूर फरफटतही नेलं.या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर स्थानिकांनी आधी कारचालकाला चोप दिला. मात्र, त्यानंतर जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचाराआधीच महिलेचा मृत्यू झाला. कारचालक हा मर्चंट नेव्हीमध्ये सेवेला असून स्थानिकांच्या मारहाणीत तो देखील जखमी झाला आहे.याप्रकरणी कारचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.दोन दिवसांपूर्वी वरळी परिसरात बेस्ट बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या 9 जणांना चिरडलं होतं. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर 8 जण गंभीर जखमी झाले होते. हेही वाचामुंबईत 48 तासांत 21 हून अधिक पोक्सो गुन्ह्यांची नोंद
पोलिसांच्या हातून निसटून तरूणाची ट्रेनमधून उडी

Go to Source