मुंबई महापालिका विहिरी आणि खाजगी टँकर ताब्यात घेणार

विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, विहीर आणि कूपनलिकाधारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती देऊनहीं टँकरचालक संपावर ठाम असल्याने मुंबई (mumbai) महापालिकेने (bmc) कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. संपावर तोडगा निघेपर्यंत मुंबईकरांचे पाण्याविना हाल होऊ नयेत, यासाठी महापालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू करण्याचा ठरवले असून, मुंबईतील विहिरी, कूपनलिका आणि खासगी टैंकर ताब्यात घेण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, महापालिकेच्या इशाऱ्यानंतरही संप सुरूच ठेवणार असल्याचे मुंबई टैंकर असोसिएशनने स्पष्ट केले. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीविरोधात मुंबईतील टँकरचालकांनी गुरुवारपासून संप पुकारला आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीनुसार सर्व विहिरी आणि कूपनलिकाधारकांनी पाणीउपसा करण्यापूर्वी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करावे बंधनकारक करण्यात आले आहे. या अनुषंगाने महापालिकेने मुंबईतील विहीर व कूपनलिका मालकांना नोटीस बजावल्या. या कारवाईविरुद्ध तसेच इतर मागण्यांवर टँकरचालक ठाम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलशक्तीमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) विहीर आणि कूपनलिकाधारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती देण्यात आली. तरीही टँकरचालक (tanker) ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने महापालिकेने कठोर निर्णय घेतला आहे. टँकरचालकांच्या संपाचा आज, सोमवारी पाचवा दिवस आहे. महापालिकेने कठोर पाऊल उचलले असले तरी टँकरचालक मात्र संपवर ठाम आहेत. आमच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक असल्याचे टँकर असोशिएशनने म्हटले आहे. त्याचबरोबर पालिकेने कठोर पावले उचलली असली तरी त्याची अंमलबजावणी करणे तितके सहज सोपे नसल्याचे टँकरचालकांनी म्हटले आहे.हेही वाचा यलो लाईनच्या चाचण्या सुरू होणार वाशी रेल्वे स्थानकाजवळ रायझोफोरा म्युक्रोनाटा वृक्षारोपण

मुंबई महापालिका विहिरी आणि खाजगी टँकर ताब्यात घेणार

विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, विहीर आणि कूपनलिकाधारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती देऊनहीं टँकरचालक संपावर ठाम असल्याने मुंबई (mumbai) महापालिकेने (bmc) कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. संपावर तोडगा निघेपर्यंत मुंबईकरांचे पाण्याविना हाल होऊ नयेत, यासाठी महापालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू करण्याचा ठरवले असून, मुंबईतील विहिरी, कूपनलिका आणि खासगी टैंकर ताब्यात घेण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, महापालिकेच्या इशाऱ्यानंतरही संप सुरूच ठेवणार असल्याचे मुंबई टैंकर असोसिएशनने स्पष्ट केले. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीविरोधात मुंबईतील टँकरचालकांनी गुरुवारपासून संप पुकारला आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीनुसार सर्व विहिरी आणि कूपनलिकाधारकांनी पाणीउपसा करण्यापूर्वी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करावे बंधनकारक करण्यात आले आहे. या अनुषंगाने महापालिकेने मुंबईतील विहीर व कूपनलिका मालकांना नोटीस बजावल्या. या कारवाईविरुद्ध तसेच इतर मागण्यांवर टँकरचालक ठाम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलशक्तीमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) विहीर आणि कूपनलिकाधारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती देण्यात आली. तरीही टँकरचालक (tanker) ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने महापालिकेने कठोर निर्णय घेतला आहे. टँकरचालकांच्या संपाचा आज, सोमवारी पाचवा दिवस आहे. महापालिकेने कठोर पाऊल उचलले असले तरी टँकरचालक मात्र संपवर ठाम आहेत. आमच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक असल्याचे टँकर असोशिएशनने म्हटले आहे. त्याचबरोबर पालिकेने कठोर पावले उचलली असली तरी त्याची अंमलबजावणी करणे तितके सहज सोपे नसल्याचे टँकरचालकांनी म्हटले आहे.हेही वाचायलो लाईनच्या चाचण्या सुरू होणारवाशी रेल्वे स्थानकाजवळ रायझोफोरा म्युक्रोनाटा वृक्षारोपण

Go to Source