मुंबई महापालिका समुद्रात दिशानिर्देशक सौर दिवे बसवणार
गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात अनेक जण खोल समुद्रात मूर्ती विसर्जनासाठी प्रयत्न करतात. यामध्ये अपघाताचा धोका असतो, शिवाय नंतर मूर्ती पाण्यातून काढतानाही अडचणी येतात. यावर तोडगा म्हणून मुंबई (mumbai) महापालिकेने समुद्रातील ओहोटी रेषेजवळ मरिन नेव्हिगेशन बॉयज (दिशानिर्देशक) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कुठपर्यंत विसर्जन करावे, हे चिन्हांकित करण्यात येणार आहे. त्यामुळे अगदी खोलवर विसर्जन होऊ शकणार नाही.महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई महापालिकेच्या (bmc) पर्यावरण विभागाने ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत गिरगाव चौपाटी, दादर (dadar) शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई चौपाटी येते. या समुद्रात गणेशेमूर्तींचे तसेच देवींच्या मूर्तींचेही विसर्जन होते. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी अनेक जण समुद्रात खोलवर जातात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. शिवाय मूर्ती विसर्जन केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्या बाहेर काढण्यासाठीही बरीच खटाटोप करावी लागते. बऱ्याच वेळा ओहोटीनंतर या मूर्ती चौपाट्यांवर इतस्तत: पसरलेल्या असतात, तर अनेक मूर्ती समुद्रातही खोलवर असतात. त्यामुळे ओहोटी रेषा व भरती रेषा या दरम्यान चिन्हांकित करून विसर्जनाचे क्षेत्र दर्शवणारे दिशानिर्देशक बसवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील पर्यावरण विभागाने दिली. यामुळे एका ठराविक अंतरापर्यंतच विसर्जन करता येणार आहे.यामुळे दुसऱ्या दिवशी समुद्रातून 100 टक्के मूर्ती सहज बाहेर काढण्यास शक्य होणार असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या दिशानिर्देशकावर सौर दिवाही असेल. जेणेकरून मूर्ती विसर्जन करणाऱ्यांना तो स्पष्टपणे दिसेल. या कामासाठी निविदाही काढण्यात आली आहे. सहा चौपाट्यांवरील एकूण 43 ठिकाणी ही नवीन दिशादर्शक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यामध्ये पर्यावणाची हानी थांबवणे हाही उद्देश आहे.यामध्ये तज्ज्ञ असलेल्या केंद्र शासनाची मान्यता असलेल्या दोन संस्थांच्या देखरेखीखाली ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. मुंबईतील ओहोटी रेषा, भरती रेषा नेमकी कुठली आणि कुठपर्यंत सौर दिवा असलेली दिशानिर्देशक यंत्रणा बसवावी, हे या दोन संस्था निश्चित करणार आहे. या कामासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख 16 जून आहे. ही यंत्रणा यंदाच्या गणेशोत्सवाआधीच चौपाट्यांवर बसवण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.गिरगाव चौपाटी, दादर शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा, अक्सा, गोराई येथील समुद्रात ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदीचे आदेश जारी केल्यानंतर, मुंबई महापालिकेकडून गणेशोत्सवासाठीही यंदाच्या त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. हेही वाचामहापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?महाराष्ट्र सरकारच्या जात प्रमाणपत्राची प्रक्रिया आता एका क्लिकवर
Home महत्वाची बातमी मुंबई महापालिका समुद्रात दिशानिर्देशक सौर दिवे बसवणार
मुंबई महापालिका समुद्रात दिशानिर्देशक सौर दिवे बसवणार
गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात अनेक जण खोल समुद्रात मूर्ती विसर्जनासाठी प्रयत्न करतात. यामध्ये अपघाताचा धोका असतो, शिवाय नंतर मूर्ती पाण्यातून काढतानाही अडचणी येतात.
यावर तोडगा म्हणून मुंबई (mumbai) महापालिकेने समुद्रातील ओहोटी रेषेजवळ मरिन नेव्हिगेशन बॉयज (दिशानिर्देशक) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कुठपर्यंत विसर्जन करावे, हे चिन्हांकित करण्यात येणार आहे. त्यामुळे अगदी खोलवर विसर्जन होऊ शकणार नाही.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई महापालिकेच्या (bmc) पर्यावरण विभागाने ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत गिरगाव चौपाटी, दादर (dadar) शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई चौपाटी येते. या समुद्रात गणेशेमूर्तींचे तसेच देवींच्या मूर्तींचेही विसर्जन होते.
मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी अनेक जण समुद्रात खोलवर जातात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. शिवाय मूर्ती विसर्जन केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्या बाहेर काढण्यासाठीही बरीच खटाटोप करावी लागते. बऱ्याच वेळा ओहोटीनंतर या मूर्ती चौपाट्यांवर इतस्तत: पसरलेल्या असतात, तर अनेक मूर्ती समुद्रातही खोलवर असतात.
त्यामुळे ओहोटी रेषा व भरती रेषा या दरम्यान चिन्हांकित करून विसर्जनाचे क्षेत्र दर्शवणारे दिशानिर्देशक बसवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील पर्यावरण विभागाने दिली. यामुळे एका ठराविक अंतरापर्यंतच विसर्जन करता येणार आहे.
यामुळे दुसऱ्या दिवशी समुद्रातून 100 टक्के मूर्ती सहज बाहेर काढण्यास शक्य होणार असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या दिशानिर्देशकावर सौर दिवाही असेल. जेणेकरून मूर्ती विसर्जन करणाऱ्यांना तो स्पष्टपणे दिसेल.
या कामासाठी निविदाही काढण्यात आली आहे. सहा चौपाट्यांवरील एकूण 43 ठिकाणी ही नवीन दिशादर्शक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यामध्ये पर्यावणाची हानी थांबवणे हाही उद्देश आहे.
यामध्ये तज्ज्ञ असलेल्या केंद्र शासनाची मान्यता असलेल्या दोन संस्थांच्या देखरेखीखाली ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. मुंबईतील ओहोटी रेषा, भरती रेषा नेमकी कुठली आणि कुठपर्यंत सौर दिवा असलेली दिशानिर्देशक यंत्रणा बसवावी, हे या दोन संस्था निश्चित करणार आहे.
या कामासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख 16 जून आहे. ही यंत्रणा यंदाच्या गणेशोत्सवाआधीच चौपाट्यांवर बसवण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
गिरगाव चौपाटी, दादर शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा, अक्सा, गोराई येथील समुद्रात ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदीचे आदेश जारी केल्यानंतर, मुंबई महापालिकेकडून गणेशोत्सवासाठीही यंदाच्या त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.हेही वाचा
महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?
महाराष्ट्र सरकारच्या जात प्रमाणपत्राची प्रक्रिया आता एका क्लिकवर