मुंबई महापालिकेचा फूटपाथसाठी ‘इतका’ निधी

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (brihanmumbai municipal corporation) 2025 – 26 चा अर्थसंकल्प जाहीर झाला. यातील विशेष मुद्द्यांपैकी एक म्हणजे मुंबईत (mumbai) पादचाऱ्यांसाठी आणि अपंगांसाठी अनुकूल पदपथ म्हणजेच फूटपाथ (footpath) बनवण्यासाठी ‘युनिव्हर्सल फूटपाथ पॉलिसी’ची अंमलबजावणी करणे. 100 कोटी रुपयांच्या तरतुदीसह महापालिका (bmc) शहरात फूटपाथच्या क्षमतेमध्ये सुधारणा करण्याची योजना आखत आहे. 2023 मध्ये महापालिकेने 2016 मध्ये सुरू झालेल्या पादचाऱ्यांसाठीच्या धोरणाचा पाठपुरावा करून ‘युनिव्हर्सल फूटपाथ पॉलिसी’ प्रकाशित केली होती. त्यात काही मुद्दे मांडले होते जसे की फूटपाथ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असावेत. तसेच कर्बची उंची 6 इंचापेक्षा जास्त नसावी, व्हीलचेअरसाठी किमान रुंदी 1.2 मीटर आणि द्वि-दिशात्मक प्रवाहासाठी 1.5 मीटरपर्यंत असली  पाहिजे. “शहरात पादचाऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे आणि त्यासाठी फूटपाथ वापरण्यायोग्य असले पाहिजेत, असे नसल्याने पादचाऱ्यांना (pedestrian) चालण्यासाठी कॅरेजवेचा वापर करावा लागतो, जे त्यांच्यासाठी असुरक्षित आहे, तसेच त्यामुळे वाहतुकीची समस्या देखील निर्माण होते,” असे अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले. फूटपाथ सुधारण्यासाठी ज्या तपशीलांचे पालन केले जाईल ते इंडियन रोड्स काँग्रेस (IRC) च्या मानक गुणांवर आधारित असतील, असे ते म्हणाले. उदाहरणार्थ, जर फूटपथ संपलाच तर तो उतारासह संपेल, जेणेकरून व्हीलचेअर वापरणारे आणि ज्येष्ठ नागरिक ते वापरू शकतील. त्याचप्रमाणे, फूटपाथची उंची 6 इंचांपेक्षा जास्त नसावी, असे त्यांनी स्पष्ट केले.हेही वाचा मीटर रिकॅलिब्रेटवरून भाडेवाढीचा गोंधळ नवी मुंबईत आरटीओकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई
मुंबई महापालिकेचा फूटपाथसाठी ‘इतका’ निधी


बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (brihanmumbai municipal corporation) 2025 – 26 चा अर्थसंकल्प जाहीर झाला. यातील विशेष मुद्द्यांपैकी एक म्हणजे मुंबईत (mumbai) पादचाऱ्यांसाठी आणि अपंगांसाठी अनुकूल पदपथ म्हणजेच फूटपाथ (footpath) बनवण्यासाठी ‘युनिव्हर्सल फूटपाथ पॉलिसी’ची अंमलबजावणी करणे. 100 कोटी रुपयांच्या तरतुदीसह महापालिका (bmc) शहरात फूटपाथच्या क्षमतेमध्ये सुधारणा करण्याची योजना आखत आहे.2023 मध्ये महापालिकेने 2016 मध्ये सुरू झालेल्या पादचाऱ्यांसाठीच्या धोरणाचा पाठपुरावा करून ‘युनिव्हर्सल फूटपाथ पॉलिसी’ प्रकाशित केली होती. त्यात काही मुद्दे मांडले होते जसे की फूटपाथ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असावेत. तसेच कर्बची उंची 6 इंचापेक्षा जास्त नसावी, व्हीलचेअरसाठी किमान रुंदी 1.2 मीटर आणि द्वि-दिशात्मक प्रवाहासाठी 1.5 मीटरपर्यंत असली  पाहिजे.“शहरात पादचाऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे आणि त्यासाठी फूटपाथ वापरण्यायोग्य असले पाहिजेत, असे नसल्याने पादचाऱ्यांना (pedestrian) चालण्यासाठी कॅरेजवेचा वापर करावा लागतो, जे त्यांच्यासाठी असुरक्षित आहे, तसेच त्यामुळे वाहतुकीची समस्या देखील निर्माण होते,” असे अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले.फूटपाथ सुधारण्यासाठी ज्या तपशीलांचे पालन केले जाईल ते इंडियन रोड्स काँग्रेस (IRC) च्या मानक गुणांवर आधारित असतील, असे ते म्हणाले. उदाहरणार्थ, जर फूटपथ संपलाच तर तो उतारासह संपेल, जेणेकरून व्हीलचेअर वापरणारे आणि ज्येष्ठ नागरिक ते वापरू शकतील. त्याचप्रमाणे, फूटपाथची उंची 6 इंचांपेक्षा जास्त नसावी, असे त्यांनी स्पष्ट केले.हेही वाचामीटर रिकॅलिब्रेटवरून भाडेवाढीचा गोंधळनवी मुंबईत आरटीओकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

Go to Source