मुंबईत 14 हजारांहून अधिक जाहिरातींचे बॅनर हटवले

गणेशोत्सव संपल्यानंतर पालिकेने स्वच्छता मोहीम राबवली असून मुंबईभर (mumbai) जाहिरात फलक हटवण्याची मोहीमही सुरू केली आहे. अनंत चतुर्दशीच्या 24 तासांत पालिकेच्या परवाना विभागाने 14 हजारांहून अधिक जाहिरात फलक (banner), भित्तीचित्र, कमानी, ध्वज हटवले आहेत. गणेशोत्सवादरम्यान धार्मिक, राजकीय आणि व्यावसायिक होर्डिंग्ज येतात. मंडळ परिसरात राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, विविध व्यावसायिक संस्थांच्या जाहिराती गणेशोत्सव मंडळांच्या जाहिराती लावण्यात आल्या होत्या. मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर सार्वजनिक गणेश मंडळे असल्याने गणेशोत्सवादरम्यान सर्व गल्ल्या जाहिरातींनी व्यापलेल्या असतात. गणेशोत्सवानंतर जाहिरात फलक काढले जात नाहीत. त्यामुळे पालिकेच्या परवाना विभागाने यंदा जाहिरात फलक काढण्याची मोहीम सुरू केली आहे. महापालिकेच्या परवाना विभागाने अनंत चतुर्दशीनंतर 24 तासांत मुंबईतील 14 हजारांहून अधिक जाहिरात होर्डिंग्ज, फलक, भित्तीचित्र, कमानी, झेंडे हटवले आहेत. यामध्ये धार्मिक, राजकीय आणि व्यावसायिक होर्डिंग्जची संख्या सर्वाधिक होती. मुंबईतून सर्वाधिक 7656 धार्मिक होर्डिंग हटवण्यात आले आहेत. त्यापैकी 807 राजकीय आणि 260 व्यावसायिक होर्डिंग्ज काढण्यात आली आहेत. अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम या पश्चिम विभागातून बहुतांश फलक हटवण्यात आले आहेत. हेही वाचा मुंबईतील सेमीकंडक्टर प्रकल्प मविआचे सरकारच पूर्ण करेल : रोहित पवार पार्किंग योजना रद्द केल्यामुळे दक्षिण मुंबईतील रहिवासी आनंदी

मुंबईत 14 हजारांहून अधिक जाहिरातींचे बॅनर हटवले

गणेशोत्सव संपल्यानंतर पालिकेने स्वच्छता मोहीम राबवली असून मुंबईभर (mumbai) जाहिरात फलक हटवण्याची मोहीमही सुरू केली आहे. अनंत चतुर्दशीच्या 24 तासांत पालिकेच्या परवाना विभागाने 14 हजारांहून अधिक जाहिरात फलक (banner), भित्तीचित्र, कमानी, ध्वज हटवले आहेत.गणेशोत्सवादरम्यान धार्मिक, राजकीय आणि व्यावसायिक होर्डिंग्ज येतात. मंडळ परिसरात राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, विविध व्यावसायिक संस्थांच्या जाहिराती गणेशोत्सव मंडळांच्या जाहिराती लावण्यात आल्या होत्या.मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर सार्वजनिक गणेश मंडळे असल्याने गणेशोत्सवादरम्यान सर्व गल्ल्या जाहिरातींनी व्यापलेल्या असतात. गणेशोत्सवानंतर जाहिरात फलक काढले जात नाहीत. त्यामुळे पालिकेच्या परवाना विभागाने यंदा जाहिरात फलक काढण्याची मोहीम सुरू केली आहे.महापालिकेच्या परवाना विभागाने अनंत चतुर्दशीनंतर 24 तासांत मुंबईतील 14 हजारांहून अधिक जाहिरात होर्डिंग्ज, फलक, भित्तीचित्र, कमानी, झेंडे हटवले आहेत. यामध्ये धार्मिक, राजकीय आणि व्यावसायिक होर्डिंग्जची संख्या सर्वाधिक होती. मुंबईतून सर्वाधिक 7656 धार्मिक होर्डिंग हटवण्यात आले आहेत. त्यापैकी 807 राजकीय आणि 260 व्यावसायिक होर्डिंग्ज काढण्यात आली आहेत. अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम या पश्चिम विभागातून बहुतांश फलक हटवण्यात आले आहेत. हेही वाचामुंबईतील सेमीकंडक्टर प्रकल्प मविआचे सरकारच पूर्ण करेल : रोहित पवारपार्किंग योजना रद्द केल्यामुळे दक्षिण मुंबईतील रहिवासी आनंदी

Go to Source