लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा

मुंबई (mumbai) लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास आता दूर होणार आहे. रेल्वे प्रशासनाने लोकलच्या एका डब्याचे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डब्यात (senior citizen coach) रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासंदर्भातील वर्क ऑर्डर देण्यास रेल्वे प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल उच्च न्यायालयाने (bombay high court) बुधवारी नाराजी व्यक्त केली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला लोकलमध्ये (mumbai local train) स्वतंत्र डबे उपलब्ध होईपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना मालडब्बातून प्रवास करण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले. दोन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबे उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने न्यायालयाला दिले. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी दाखल केलेली याचिका निकाली काढली. मध्य आणि पश्चिम उपनगरीय भागातून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काही जागा राखीव असतात. मात्र, उपनगरीय लोकल गाड्यांमधील गर्दी लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांना त्या सीटवर जाणे शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर उपाय म्हणून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. पश्चिम रेल्वेच्या (western railway) विभागीय व्यावसायिक व्यवस्थापकाने याचिकेवर उत्तर दाखल करताना सांगितले की, पश्चिम आणि मध्य रेल्वेने गेल्या वर्षी रेल्वे बोर्डाला माल डबा (चर्चगेटच्या दिशेकडील सातवा लोकल डबा) बदलण्याची शिफारस केली होती. या कोचला ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कोच म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने या वर्षी 27 फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली होती. नायर यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्याचवेळी न्यायालयाला याबाबत माहिती देण्यात आली. तसेच, याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येत असून येत्या दोन वर्षांत मध्य रेल्वेचे 155 डबे आणि पश्चिम रेल्वेचे 105 डबे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्यांमध्ये रूपांतरित केले जातील, असे रेल्वे प्रशासनाने खंडपीठाला सांगितले. मात्र, अद्याप वर्क ऑर्डर देण्यात आलेली नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.हेही वाचा पार्किंग योजना रद्द केल्यामुळे दक्षिण मुंबईतील रहिवासी आनंदी सप्टेंबर अखेरपर्यंत ठाणे खाडी पूल-3 खुला होणार

लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा

मुंबई (mumbai) लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास आता दूर होणार आहे. रेल्वे प्रशासनाने लोकलच्या एका डब्याचे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डब्यात (senior citizen coach) रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासंदर्भातील वर्क ऑर्डर देण्यास रेल्वे प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल उच्च न्यायालयाने (bombay high court) बुधवारी नाराजी व्यक्त केली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला लोकलमध्ये (mumbai local train) स्वतंत्र डबे उपलब्ध होईपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना मालडब्बातून प्रवास करण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले. दोन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबे उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने न्यायालयाला दिले. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी दाखल केलेली याचिका निकाली काढली.मध्य आणि पश्चिम उपनगरीय भागातून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काही जागा राखीव असतात. मात्र, उपनगरीय लोकल गाड्यांमधील गर्दी लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांना त्या सीटवर जाणे शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर उपाय म्हणून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.पश्चिम रेल्वेच्या (western railway) विभागीय व्यावसायिक व्यवस्थापकाने याचिकेवर उत्तर दाखल करताना सांगितले की, पश्चिम आणि मध्य रेल्वेने गेल्या वर्षी रेल्वे बोर्डाला माल डबा (चर्चगेटच्या दिशेकडील सातवा लोकल डबा) बदलण्याची शिफारस केली होती. या कोचला ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कोच म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने या वर्षी 27 फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली होती.नायर यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्याचवेळी न्यायालयाला याबाबत माहिती देण्यात आली. तसेच, याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येत असून येत्या दोन वर्षांत मध्य रेल्वेचे 155 डबे आणि पश्चिम रेल्वेचे 105 डबे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्यांमध्ये रूपांतरित केले जातील, असे रेल्वे प्रशासनाने खंडपीठाला सांगितले. मात्र, अद्याप वर्क ऑर्डर देण्यात आलेली नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.हेही वाचापार्किंग योजना रद्द केल्यामुळे दक्षिण मुंबईतील रहिवासी आनंदीसप्टेंबर अखेरपर्यंत ठाणे खाडी पूल-3 खुला होणार

Go to Source