मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना दिल्लीविरुद्ध

महिला प्रिमियर लीगचे वेळापत्रक जाहीर वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2024 च्या क्रिकेट हंगामातील महिलांच्या प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेला बेंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 23 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स संघाचा सलामीचा सामना गेल्या वर्षी या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स बरोबर होणार आहे. 2024 ची महिलांची प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा बेंगळूर […]

मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना दिल्लीविरुद्ध

महिला प्रिमियर लीगचे वेळापत्रक जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या क्रिकेट हंगामातील महिलांच्या प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेला बेंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 23 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स संघाचा सलामीचा सामना गेल्या वर्षी या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स बरोबर होणार आहे.
2024 ची महिलांची प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा बेंगळूर आणि दिल्ली येथे खेळविली जाणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये या स्पर्धेतील एलिमनेटर आणि अंतिम सामना अनुक्रमे 15 आणि 17 मार्चला होणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 22 सामने खेळविले जातील. या स्पर्धेच्या गुणतक्त्यातील पहिल्या दोन आघाडीच्या संघात अंतिम सामना खेळविला जाईल. त्याचप्रमाणे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांमध्ये इलिमनेटरचा सामना होईल. मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व हरमनप्रित कौरकडे सोपविण्यात आले आहे. 2023 साली झालेल्या पहिल्या महिलांच्या प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 7 गड्यांनी पराभव करत विजेतेपद मिळविले होते. गेल्या महिन्यात या स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात आला होता. एकूण 165 महिला क्रिकेटपटूंमध्ये लिलावाची बोली लावण्यात आली होती. आणि या स्पर्धेकरीता 30 खेळाडूंची निवड करण्यात आली.
तारीख                                  संघ                                         ठिकाण
23 फेब्रुवारी          मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स         बेंगळूर
24 फेब्रुवारी         रॉयल चॅलेंजर बेंगळूर वि. युपी वॉरियर्स   बेंगळूर
25 फेब्रुवारी          गुजरात जायंट्स वि. मुंबई इंडियन्स         बेंगळूर
26 फेब्रुवारी         युपी वॉरियर्स वि. दिल्ली कॅपिटल्स            बेंगळूर
27 फेब्रुवारी         रॉयल चॅलेंजर बेंगळूर वि. गुजरात जायंट्स            बेंगळूर
28 फेब्रुवारी         मुंबई इंडियन्स वि. युपी वॉरियर्स                बेंगळूर
29 फेब्रुवारी         रॉयल चॅलेंजर बेंगळूर वि. दिल्ली कॅपिटल्स            बेंगळूर
1 मार्च      युपी वॉरियर्स वि. गुजरात जायंट्स            बेंगळूर
2 मार्च       रॉयल चॅलेंजर बेंगळूर वि. मुंबई इंडियन्स                बेंगळूर
3 मार्च     गुजरात जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स     बेंगळूर
4 मार्च      युपी वॉरियर्स वि. रॉयल चॅलेंजर बेंगळूर   बेंगळूर
5 मार्च    दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स         दिल्ली
6 मार्च   गुजरात जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर बेंगळूर            दिल्ली
7 मार्च   युपी वॉरियर्स वि. मुंबई इंडियन्स                दिल्ली
8 मार्च   दिल्ली कॅपिटल्स वि. युपी वॉरियर्स            दिल्ली
9 मार्च   मुंबई इंडियन्स वि. गुजरात जायंट्स         दिल्ली
10 मार्च दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर बेंगळूर            दिल्ली
11 मार्च  गुजरात जायंट्स वि. युपी वॉरियर्स            दिल्ली
12 मार्च मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर बेंगळूर                दिल्ली
13 मार्च  दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात जायंट्स     दिल्ली
15 मार्च  एलिमनेटर सामना          दिल्ली
17 मार्च अंतिम सामना   दिल्ली