महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर
मुंबईसह महाराष्ट्रात पुढील आठवडाभर मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसह काही भागात आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
विभागानुसार, 22 मे रोजी कर्नाटक किनारपट्टीवर अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सोमवारपासून पुढील रविवारीपर्यंत महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढेल. कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.शनिवारी मुंबईत आभाळ भरून राहिले होते आणि हवामान उष्ण आणि दमट होते. सकाळी 8 ते 9 या वेळेत शहरात अनेक ठिकाणी 10 ते 20 मिमी दरम्यान पावसाची नोंद झाली. हवामान विभागानुसार हे वातावरण बुधवारपर्यंत कायम राहणार आहे.मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडच्या काही भागांमध्ये 40-50 किमी/तास वेगाने वारे, वीज चमकणे आणि हलक्यापासून मध्यम पावसापर्यंत हवामान राहणार आहे. मात्र, सोमवारी मुंबई आणि पालघरमध्ये यलोऐवजी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच सौम्य पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतात यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर पोहोचत असून, त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरही जाणवणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पुढील आठवडाभर मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पावसाचा इशारा असून तापमान व आर्द्रतेमुळे उकाडाही कायम राहणार आहे.मुंबईतील पावसाची विभागनिहाय नोंद :नायर रुग्णालय (दक्षिण मुंबई) : 14 मिमीकुर्ला व पवई (पूर्व उपनगर) : 12 मिमीखार पश्चिम : 20 मिमी (सर्वाधिक)बांद्रा पश्चिम : 18 मिमी, l जोगेश्वरी : 16 मिमीबीकेसी : 14 मिमी l मरोळ : 13 मिमीआरे कॉलनी (गोरेगाव) : 11 मिमीशनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासांत, फक्त कुलाबा केंद्रावर 8 मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रुझमध्ये तुरळक पावसाची नोंद झाली.हेही वाचानवी मुंबईतील कोपरखैरणे होल्डिंग पॉन्डमध्ये बोटिंग सुविधा मिळणार
महाराष्ट्र सरकार ‘सीप्लेन पर्यटन’ पुन्हा सुरू करणार
Home महत्वाची बातमी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर
मुंबईसह महाराष्ट्रात पुढील आठवडाभर मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसह काही भागात आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.विभागानुसार, 22 मे रोजी कर्नाटक किनारपट्टीवर अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सोमवारपासून पुढील रविवारीपर्यंत महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढेल. कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शनिवारी मुंबईत आभाळ भरून राहिले होते आणि हवामान उष्ण आणि दमट होते. सकाळी 8 ते 9 या वेळेत शहरात अनेक ठिकाणी 10 ते 20 मिमी दरम्यान पावसाची नोंद झाली. हवामान विभागानुसार हे वातावरण बुधवारपर्यंत कायम राहणार आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडच्या काही भागांमध्ये 40-50 किमी/तास वेगाने वारे, वीज चमकणे आणि हलक्यापासून मध्यम पावसापर्यंत हवामान राहणार आहे. मात्र, सोमवारी मुंबई आणि पालघरमध्ये यलोऐवजी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच सौम्य पावसाची शक्यता आहे.
दक्षिण भारतात यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर पोहोचत असून, त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरही जाणवणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पुढील आठवडाभर मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पावसाचा इशारा असून तापमान व आर्द्रतेमुळे उकाडाही कायम राहणार आहे.
मुंबईतील पावसाची विभागनिहाय नोंद :
नायर रुग्णालय (दक्षिण मुंबई) : 14 मिमी
कुर्ला व पवई (पूर्व उपनगर) : 12 मिमी
खार पश्चिम : 20 मिमी (सर्वाधिक)
बांद्रा पश्चिम : 18 मिमी, l जोगेश्वरी : 16 मिमी
बीकेसी : 14 मिमी l मरोळ : 13 मिमी
आरे कॉलनी (गोरेगाव) : 11 मिमी
शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासांत, फक्त कुलाबा केंद्रावर 8 मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रुझमध्ये तुरळक पावसाची नोंद झाली.हेही वाचा
नवी मुंबईतील कोपरखैरणे होल्डिंग पॉन्डमध्ये बोटिंग सुविधा मिळणारमहाराष्ट्र सरकार ‘सीप्लेन पर्यटन’ पुन्हा सुरू करणार
