लालबाग : मद्यधुंद प्रवाशामुळे बेस्ट बसचा अपघात, तरुणीचा मृत्यू

रविवारी रात्री लालबागमध्ये BEST बसने नऊ जणांना धडक दिली. त्यापैकी पाच जणांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर तिघांवर अद्याप उपचार सुरू आहेत. मात्र, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बसमधील मद्यधुंद प्रवाशामुळे हा अपघात झाल्याचे समजते. बसमधील एका मद्यधुंद प्रवाशाने चालकाशी हुज्जत घातली. त्या मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशाने चालकाला बाजूला ढकलून बसचं स्टेअरिंग पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. मद्यधुंद व्यक्तीने स्टेअरिंगचे चाक वळवले आणि बस काही वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडकली. या अपघातात नऊ जण जखमी झाली. जखमींना जवळपासच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील एका तरुणीचा मृत्यू झाला असून, जखमींपैकी पाच जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून तिघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, “बेस्टची 66 क्रमांकाची इलेक्ट्रीक बस असून ही बस सायनच्या राणी लक्मीबाई चौकातून दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर इथं जात होती. बसमध्ये चढलेल्या मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशांचा चालकासोबत वाद झाला आणि क्षणात हा वाद विकोपास गेला. बस लालबागला पोहोचताच प्रवाशानं स्टेअरिंग दुसरीकडे वळवलं आणि चालकाचंही संतुलन बिघडवल्यामुळं हा अपघात घडला.”

लालबाग : मद्यधुंद प्रवाशामुळे बेस्ट बसचा अपघात, तरुणीचा मृत्यू

रविवारी रात्री लालबागमध्ये BEST बसने नऊ जणांना धडक दिली. त्यापैकी पाच जणांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर तिघांवर अद्याप उपचार सुरू आहेत. मात्र, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बसमधील मद्यधुंद प्रवाशामुळे हा अपघात झाल्याचे समजते.बसमधील एका मद्यधुंद प्रवाशाने चालकाशी हुज्जत घातली. त्या मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशाने चालकाला बाजूला ढकलून बसचं स्टेअरिंग पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. मद्यधुंद व्यक्तीने स्टेअरिंगचे चाक वळवले आणि बस काही वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडकली. या अपघातात नऊ जण जखमी झाली. जखमींना जवळपासच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील एका तरुणीचा मृत्यू झाला असून, जखमींपैकी पाच जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून तिघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेतले आहे.घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, “बेस्टची 66 क्रमांकाची इलेक्ट्रीक बस असून ही बस सायनच्या राणी लक्मीबाई चौकातून दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर इथं जात होती. बसमध्ये चढलेल्या मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशांचा चालकासोबत वाद झाला आणि क्षणात हा वाद विकोपास गेला. बस लालबागला पोहोचताच प्रवाशानं स्टेअरिंग दुसरीकडे वळवलं आणि चालकाचंही संतुलन बिघडवल्यामुळं हा अपघात घडला.”

Go to Source