मरिन ड्राइव्ह ते वरळी गाठा अवघ्या 10 मिनिटांत
मरिन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर आता फक्त दहा मिनिटांत गाठता येणार आहे. कारण आजपासून कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून (10 जून) सुरू होणार आहे. मुख्यमंत्री या बोगद्याला भेट देणार आहेत. ते कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर हा बोगदा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईकरांचा प्रवास जलद आणि अधिक सोईस्कर व्हावा, हा कोस्टल रोड प्रकल्पाचा उद्देश आहे.महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाचा मरिन ड्राइव्हपासून सुरू होणारा हा दुसरा बोगदा (Mumbai News) आहे. तो उत्तर दिशेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या दृष्टीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बोगद्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर 11 जूनपासून सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे एकूण 16 तासांच्या कालावधीसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार (Coastal Road) आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर मरिन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली हा मार्ग खुला होत आहे. हा मार्ग सुमारे 6.25 किलोमीटरचा आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान आणि हाजी अली येथील (Coastal Road Second Tunnel) अंतरमार्गिकांचा वापर देखील करता येणार आहे. या आंतरमार्गिकांमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणारी वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. प्रामुख्याने बॅ. रजनी पटेल चौकामधून पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकामधून पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी सोय होणार आहे.दर आठवड्यात हा पाच दिवस हा मार्ग वाहतुकीसाठी खुला असणार आहे. सोमवार ते शुक्रवार या मार्गावर वाहतूक सुरू राहणार आहे. तर प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार बंद राहणार आहे. 11 मार्च 2024 रोजी कोस्टल रोडची दक्षिण मार्गिका ( Marine Drive To Worli) वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली होती. याचा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. हेही वाचामुंबई-गोवा महामार्ग कधी सुरू होणार? वाचा सविस्तर
मेट्रो लाईन 2B साठी वांद्रे स्कायवॉक पाडण्याचे काम पुन्हा सुरू
Home महत्वाची बातमी मरिन ड्राइव्ह ते वरळी गाठा अवघ्या 10 मिनिटांत
मरिन ड्राइव्ह ते वरळी गाठा अवघ्या 10 मिनिटांत
मरिन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर आता फक्त दहा मिनिटांत गाठता येणार आहे. कारण आजपासून कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून (10 जून) सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री या बोगद्याला भेट देणार आहेत. ते कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर हा बोगदा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईकरांचा प्रवास जलद आणि अधिक सोईस्कर व्हावा, हा कोस्टल रोड प्रकल्पाचा उद्देश आहे.महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाचा मरिन ड्राइव्हपासून सुरू होणारा हा दुसरा बोगदा (Mumbai News) आहे. तो उत्तर दिशेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या दृष्टीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बोगद्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर 11 जूनपासून सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे एकूण 16 तासांच्या कालावधीसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार (Coastal Road) आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर मरिन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली हा मार्ग खुला होत आहे. हा मार्ग सुमारे 6.25 किलोमीटरचा आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान आणि हाजी अली येथील (Coastal Road Second Tunnel) अंतरमार्गिकांचा वापर देखील करता येणार आहे. या आंतरमार्गिकांमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणारी वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. प्रामुख्याने बॅ. रजनी पटेल चौकामधून पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकामधून पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी सोय होणार आहे.
दर आठवड्यात हा पाच दिवस हा मार्ग वाहतुकीसाठी खुला असणार आहे. सोमवार ते शुक्रवार या मार्गावर वाहतूक सुरू राहणार आहे. तर प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार बंद राहणार आहे. 11 मार्च 2024 रोजी कोस्टल रोडची दक्षिण मार्गिका ( Marine Drive To Worli) वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली होती. याचा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.हेही वाचा
मुंबई-गोवा महामार्ग कधी सुरू होणार? वाचा सविस्तरमेट्रो लाईन 2B साठी वांद्रे स्कायवॉक पाडण्याचे काम पुन्हा सुरू