छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला दोन दिवसांचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे पायाभूत सुविधांच्या कामांसाठी दोन दिवसांचा विशेष रात्रीचा ब्लॉक घेण्यात आला आहे. शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवार सकाळी 12:30 ते पहाटे 4:30 दरम्यान (दोन्ही दिवशी प्रत्येकी 4 तास) भायखळा-सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर आणि अप आणि डाउन फास्ट मार्गावर, अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील वडाळा रोड-सीएसएमटी स्थानकांवर ब्लॉक असेल. या कालावधीत लोकल सेवा उपलब्ध होणार नाही.ब्लॉक दरम्यानचे टाईमटेबलडाऊन स्लो मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटी-कसारा असेल जी मध्यरात्री 12:14 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी-कर्जत लोकल असेल जी पहाटे 4:47 वाजता सुटेल.अप स्लो मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण-सीएसएमटी असेल जी रात्री 10:34 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाणे-सीएसएमटी असेल जी पहाटे 4:00 वाजता सुटेल.डाऊन स्लो मार्गावर, हार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वी पहिली लोकल सीएसएमटी-पनवेल ही असेल जी सकाळी 12:13 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल सीएसएमटी-पनवेल असेल जी पहाटे 4:52 वाजता सुटेल.अप स्लो मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल ते सीएसएमटीसाठी धावेल जी रात्री 10:46 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतर पहिली लोकल वांद्रे ते सीएसएमटीपर्यंत धावेल जी पहाटे 4:17 वाजता सुटेल.दादरपर्यंतच गाड्या धावतीलब्लॉक कालावधीत हावडा-सीएसटीएम एक्स्प्रेस, मडगाव-सीएसटीएम जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसटीएम एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसटीएम ट्रेन दादरपर्यंतच धावतील.हेही वाचागुड न्यूज! मुंबईला मिळणार 3 Bullet Trains
ठाणे : कापूरबावडी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
Home महत्वाची बातमी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला दोन दिवसांचा मेगाब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला दोन दिवसांचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे पायाभूत सुविधांच्या कामांसाठी दोन दिवसांचा विशेष रात्रीचा ब्लॉक घेण्यात आला आहे. शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवार सकाळी 12:30 ते पहाटे 4:30 दरम्यान (दोन्ही दिवशी प्रत्येकी 4 तास) भायखळा-सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर आणि अप आणि डाउन फास्ट मार्गावर, अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील वडाळा रोड-सीएसएमटी स्थानकांवर ब्लॉक असेल. या कालावधीत लोकल सेवा उपलब्ध होणार नाही.
ब्लॉक दरम्यानचे टाईमटेबल
डाऊन स्लो मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटी-कसारा असेल जी मध्यरात्री 12:14 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी-कर्जत लोकल असेल जी पहाटे 4:47 वाजता सुटेल.
अप स्लो मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण-सीएसएमटी असेल जी रात्री 10:34 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाणे-सीएसएमटी असेल जी पहाटे 4:00 वाजता सुटेल.
डाऊन स्लो मार्गावर, हार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वी पहिली लोकल सीएसएमटी-पनवेल ही असेल जी सकाळी 12:13 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल सीएसएमटी-पनवेल असेल जी पहाटे 4:52 वाजता सुटेल.
अप स्लो मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल ते सीएसएमटीसाठी धावेल जी रात्री 10:46 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतर पहिली लोकल वांद्रे ते सीएसएमटीपर्यंत धावेल जी पहाटे 4:17 वाजता सुटेल.
दादरपर्यंतच गाड्या धावतील
ब्लॉक कालावधीत हावडा-सीएसटीएम एक्स्प्रेस, मडगाव-सीएसटीएम जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसटीएम एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसटीएम ट्रेन दादरपर्यंतच धावतील.हेही वाचा
गुड न्यूज! मुंबईला मिळणार 3 Bullet Trainsठाणे : कापूरबावडी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
