गरजू मुलांसाठी बीएमसी मोफत, वातानुकूलित शाळा उभारणार

झोपडपट्टी भागातील वंचित विद्यार्थ्यांसाठी कंटेनरमध्ये मोफत, वातानुकूलित अभ्यास कक्ष उपलब्ध करून देण्यासाठी बीएमसी लवकरच एक उपक्रम सुरू करणार आहे. यापैकी पहिली अभ्यासिका दक्षिण मुंबईत उभारली जाणार आहे. आता या प्रकल्पासाठी निविदा उघडल्या आहेत. कुलाब्यातील गणेशमूर्ती नगर येथील अभ्यास कक्षात प्रत्येकी 15 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले दोन कंटेनर असतील. कंटेनर टेबल आणि खुर्च्यांनी सुसज्ज असे असतील. “वातानुकूलित आणि इतर सुविधांवर काम सुरू आहे, त्यासाठी निविदा जारी केल्या आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील महिन्याभरात अभ्यासिका सुरू करण्याची आमची योजना आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, “मी अधिकाऱ्यांना गरजू विद्यार्थ्यांसाठी हे कंटेनर ठेवता येतील अशा झोपडपट्ट्या ओळखण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणींचा अडथळा येऊ नये. या उपक्रमामुळे त्यांना शिक्षणासाठी आरामदायक वातावरण मिळेल. या प्रकल्पाला जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC) द्वारे निधी दिला जाईल.” अमर महल जंक्शन येथे सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) उड्डाणपुलाच्या खाली पहिली ‘सिग्नल स्कूल’ उभारण्याची BMCची योजना आहे. 10 कंटेनरचा वापर करून बांधलेल्या या शाळेला 2 कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे आणि त्यासाठी DPDC द्वारे निधी दिला जाईल. यात सुमारे 60 ते 100 विद्यार्थी बसतील.  या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ लवकरच होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मे 2022 मध्ये, BMC ने मुंबईत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत आपल्या पहिल्या मोफत लायब्ररीचे उद्घाटन केले. सध्या शहरात अशी 50 ग्रंथालये आहेत.हेही वाचा धारावी पुनर्विकासाचे बांधकाम मार्च 2025 पर्यंत सुरू होणारठाणे : मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णात वाढ

गरजू मुलांसाठी बीएमसी मोफत, वातानुकूलित शाळा उभारणार

झोपडपट्टी भागातील वंचित विद्यार्थ्यांसाठी कंटेनरमध्ये मोफत, वातानुकूलित अभ्यास कक्ष उपलब्ध करून देण्यासाठी बीएमसी लवकरच एक उपक्रम सुरू करणार आहे. यापैकी पहिली अभ्यासिका दक्षिण मुंबईत उभारली जाणार आहे. आता या प्रकल्पासाठी निविदा उघडल्या आहेत. कुलाब्यातील गणेशमूर्ती नगर येथील अभ्यास कक्षात प्रत्येकी 15 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले दोन कंटेनर असतील. कंटेनर टेबल आणि खुर्च्यांनी सुसज्ज असे असतील. “वातानुकूलित आणि इतर सुविधांवर काम सुरू आहे, त्यासाठी निविदा जारी केल्या आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील महिन्याभरात अभ्यासिका सुरू करण्याची आमची योजना आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, “मी अधिकाऱ्यांना गरजू विद्यार्थ्यांसाठी हे कंटेनर ठेवता येतील अशा झोपडपट्ट्या ओळखण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणींचा अडथळा येऊ नये. या उपक्रमामुळे त्यांना शिक्षणासाठी आरामदायक वातावरण मिळेल. या प्रकल्पाला जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC) द्वारे निधी दिला जाईल.”अमर महल जंक्शन येथे सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) उड्डाणपुलाच्या खाली पहिली ‘सिग्नल स्कूल’ उभारण्याची BMCची योजना आहे. 10 कंटेनरचा वापर करून बांधलेल्या या शाळेला 2 कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे आणि त्यासाठी DPDC द्वारे निधी दिला जाईल. यात सुमारे 60 ते 100 विद्यार्थी बसतील. या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ लवकरच होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मे 2022 मध्ये, BMC ने मुंबईत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत आपल्या पहिल्या मोफत लायब्ररीचे उद्घाटन केले. सध्या शहरात अशी 50 ग्रंथालये आहेत.हेही वाचाधारावी पुनर्विकासाचे बांधकाम मार्च 2025 पर्यंत सुरू होणार
ठाणे : मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णात वाढ

Go to Source