मुंबई : माउंट मेरी फेअरसाठी बेस्टच्या जादा बसेस धावणार
वांद्रे (प) (bandra) येथील माऊंट मेरी जत्रा सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडयापासून सुरू होत आहे. त्या निमित्त 15 सप्टेंबरपर्यंत जादा बस चालवण्यात येणार आहेत. बेस्टकडून (best) संपूर्ण आठवडाभर 121 अतिरिक्त बस वांद्रे रेल्वे स्थानक (प.) ते हिल रोड उद्यान या दरम्यान चालवण्यात येतील. तसेच बेस्ट बसमार्ग क्रमांक सी-71, ए-२202, 321मर्या., ए-375, 422, 473 व सी-505 या बसमार्गावर अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येतील.माऊंट मेरी चर्च (mount merry church), फादर अॅग्नल आश्रम या परिसरात जत्रेसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर वांद्रे स्थानक (प) येथे लोकलने येऊन तेथून बेस्टच्या बसने प्रवास करतात. परंतु बस माऊंट मेरी चर्चपर्यंत चालवणे शक्य नसते. त्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानक (प) ते हिल रोड उद्यान दरम्यान जादा बस (extra bus) सोडण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त वांद्रे परिसरातून धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या नियमित बसमार्गावरही अतिरिक्त बसगाडया चालवण्यात येतील.जत्रेनिमित्त वांद्रे स्थानक (प) आणि माऊंट मेरी चर्च परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. ही गर्दी विचारात घेऊन प्रवाशांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती संपूर्ण कालावधीसाठी केली आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.हेही वाचालाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठी योजना!MMR मधल्या 9 नवीन प्रमुख प्रकल्पांना मंजुरी
Home महत्वाची बातमी मुंबई : माउंट मेरी फेअरसाठी बेस्टच्या जादा बसेस धावणार
मुंबई : माउंट मेरी फेअरसाठी बेस्टच्या जादा बसेस धावणार
वांद्रे (प) (bandra) येथील माऊंट मेरी जत्रा सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडयापासून सुरू होत आहे. त्या निमित्त 15 सप्टेंबरपर्यंत जादा बस चालवण्यात येणार आहेत.
बेस्टकडून (best) संपूर्ण आठवडाभर 121 अतिरिक्त बस वांद्रे रेल्वे स्थानक (प.) ते हिल रोड उद्यान या दरम्यान चालवण्यात येतील. तसेच बेस्ट बसमार्ग क्रमांक सी-71, ए-२202, 321मर्या., ए-375, 422, 473 व सी-505 या बसमार्गावर अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येतील.
माऊंट मेरी चर्च (mount merry church), फादर अॅग्नल आश्रम या परिसरात जत्रेसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर वांद्रे स्थानक (प) येथे लोकलने येऊन तेथून बेस्टच्या बसने प्रवास करतात. परंतु बस माऊंट मेरी चर्चपर्यंत चालवणे शक्य नसते. त्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानक (प) ते हिल रोड उद्यान दरम्यान जादा बस (extra bus) सोडण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त वांद्रे परिसरातून धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या नियमित बसमार्गावरही अतिरिक्त बसगाडया चालवण्यात येतील.
जत्रेनिमित्त वांद्रे स्थानक (प) आणि माऊंट मेरी चर्च परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. ही गर्दी विचारात घेऊन प्रवाशांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती संपूर्ण कालावधीसाठी केली आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.हेही वाचा
लाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठी योजना!
MMR मधल्या 9 नवीन प्रमुख प्रकल्पांना मंजुरी