मुंबई विमानतळ ‘युजर डेव्हलपमेंट फी’ आकारणार

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) ही अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) ची उपकंपनी आहे. तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (csmia) संचालक आहे. ही कंपनी प्रवाशांच्या सुविधांमध्ये (Development) सुव्यवस्थित बदल घडवून आणण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल उचलत आहे. विमानतळ (mumbai airport) आर्थिक नियामक प्राधिकरण (ERA) समोर सादर केलेल्या प्रस्तावात, एमआयएएलने मुंबई (mumbai) विमानतळावर पायाभूत सुविधा विकास आणि तांत्रिक सुधारणा प्रकल्प हाती घेण्यासाठी देशांतर्गत प्रवाशांसाठी 325 रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 650 रुपये यूझर डेव्हलपमेंट फी आकारणार आहे. एमआयएएलच्या प्रस्तावाद्वारे विमान लॅंडींगच्या आणि पार्किंग शुल्कात सुमारे 35 टक्के कपात करून प्रवाशांवरील खर्चाचा अधिक भार कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कपातीमुळे मुंबईतील विमान भाड्यांवर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. पुढील पाच वर्षांत, विमानतळ पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल आणि अपेक्षित 229 दशलक्ष प्रवाशांकडून एकूण 7,600 कोटी रुपये महसूल वसूल करेल. नवीन शुल्क रचनेमध्ये UDF मध्ये वाढ करून आणि लँडिंग तसेच पार्किंग शुल्क 35 टक्क्यांनी कमी करून महसूलात धोरणात्मक बदल करण्याचा प्रस्ताव आहे.हेही वाचा आता मराठीसाठी स्वतंत्र शैक्षणिक चॅनेल पक्ष्यांना खाऊ घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
मुंबई विमानतळ ‘युजर डेव्हलपमेंट फी’ आकारणार


मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) ही अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) ची उपकंपनी आहे. तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (csmia) संचालक आहे. ही कंपनी प्रवाशांच्या सुविधांमध्ये (Development) सुव्यवस्थित बदल घडवून आणण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल उचलत आहे.विमानतळ (mumbai airport) आर्थिक नियामक प्राधिकरण (ERA) समोर सादर केलेल्या प्रस्तावात, एमआयएएलने मुंबई (mumbai) विमानतळावर पायाभूत सुविधा विकास आणि तांत्रिक सुधारणा प्रकल्प हाती घेण्यासाठी देशांतर्गत प्रवाशांसाठी 325 रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 650 रुपये यूझर डेव्हलपमेंट फी आकारणार आहे.एमआयएएलच्या प्रस्तावाद्वारे विमान लॅंडींगच्या आणि पार्किंग शुल्कात सुमारे 35 टक्के कपात करून प्रवाशांवरील खर्चाचा अधिक भार कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कपातीमुळे मुंबईतील विमान भाड्यांवर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.पुढील पाच वर्षांत, विमानतळ पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल आणि अपेक्षित 229 दशलक्ष प्रवाशांकडून एकूण 7,600 कोटी रुपये महसूल वसूल करेल. नवीन शुल्क रचनेमध्ये UDF मध्ये वाढ करून आणि लँडिंग तसेच पार्किंग शुल्क 35 टक्क्यांनी कमी करून महसूलात धोरणात्मक बदल करण्याचा प्रस्ताव आहे. हेही वाचाआता मराठीसाठी स्वतंत्र शैक्षणिक चॅनेलपक्ष्यांना खाऊ घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Go to Source