मुलुंड (mulund) पश्चिमेकडील नाहूर गावात अत्याधुनिक ‘बर्ड पार्क’ सह भायखळा (byculla) प्राणीसंग्रहालयाचा विस्तार करण्याची महापालिकेची महत्त्वाकांक्षी योजना दोन वर्षांनंतरही रखडलेलीच आहे. या प्रकल्पाला केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून (CZA) तत्वतः मान्यता मिळाली आहे.तथापि, प्राणीसंग्रहालयासाठी (zoo) जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास (यूडी) विभागाकडे अद्याप प्रलंबित आहे. मुलुंड (पश्चिम) येथील ‘बर्ड पार्क’ (bird park) हे भायखळा प्राणीसंग्रहालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे लहान स्वरुपाचे प्रतिरुप असेल असे म्हटले जात आहे. त्यात आशियाई, आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन झोन या थीमवर आधारित एन्क्लोजर असतील ज्यामध्ये रेड ब्रेस्टेड पॅराकीट, व्हाइट पीकॉक, मलबार ग्रे हॉर्नबिल आणि स्कार्लेट मॅकॉ सारख्या 18 प्रजातींसह 206 पक्षी असणार आहेत. येथील पक्षीगृह 10,859 चौरस मीटर क्षेत्रांवर बांधले जाईल. तसेच 3,728 चौरस मीटरच्या मनोरंजन क्षेत्राचा समावेश यात असेल. या पक्षीगृहात विदेशी आणि स्थानिक पक्ष्यांच्या प्रजाती देखील असतील. प्रस्तावित पक्षीगृहाचा सविस्तर प्रकल्प अहवाल 2023 मध्ये तयार करण्यात आला होता. तसेच मुंबई महापालिकेच्या पक्षी उद्यानाच्या अतिरिक्त पक्ष्यांच्या प्रजाती घेण्याच्या प्रस्तावाला गेल्या वर्षी सीझेडएकडून मंजुरी मिळाली होती. तसेच उद्यानाच्या आराखड्याची रूपरेषा दर्शवणारा आणखी एक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.पक्षीगृहाच्या बांधकाम आणि डिझाइनला 100 कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. हे बांधकाम 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. महापालिकेने (bmc) पक्षी उद्यानाचा प्रस्ताव ठेवण्याची ही पहिलीच वेळ नाही. ही कल्पना पहिल्यांदा 2013 मध्ये मांडण्यात आली होती. ज्याचा अंदाजे खर्च 150 कोटी रुपये होता आणि पवईमध्ये पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना राहण्यासाठी 25 एकरचा भूखंड मंजूर करण्यात आला होता.तथापि, हा प्रकल्प अनेक वेळा पुढे ढकलण्यात आला आणि अखेर रद्द करण्यात आला. 2019 मध्ये असाच एक प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सध्या, भायखळा प्राणीसंग्रहालयात 18,234 चौरस फूट रुंद, 44 फूट उंच पक्षीगृह आहे. ज्यामध्ये 16 प्रजातींचे 222 पक्षी राहतात.हेही वाचाबदलापूर ते कर्जत दरम्यानच्या तिसऱ्या – चौथ्या मार्गिकेला मंजुरीBMC स्मार्ट पार्किंग ॲप लवकरच लाँच करणार
मुलुंड ‘बर्ड पार्क’ प्रकल्प 2 वर्षांपासून रखडलेलाच