शहरात मोहरम सण उत्साहात

मिरवणुकीत ताबूत आकर्षणाचे केंद्र   बेळगाव : शहरामध्ये मुस्लीम बांधवांतर्फे मोहरम सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील दरबार गल्ली येथे जुम्मा मशिदीजवळ शहरातील विविध भागातून आलेल्या पंजा व ताबूतांची भेट होऊन सण साजरा करण्यात आला. यावेळी ताबूत आकर्षणाचे केंद्र ठरले होते. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून शहर परिसरात मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागात पंजे मिरवणूक […]

शहरात मोहरम सण उत्साहात

मिरवणुकीत ताबूत आकर्षणाचे केंद्र  
बेळगाव : शहरामध्ये मुस्लीम बांधवांतर्फे मोहरम सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील दरबार गल्ली येथे जुम्मा मशिदीजवळ शहरातील विविध भागातून आलेल्या पंजा व ताबूतांची भेट होऊन सण साजरा करण्यात आला. यावेळी ताबूत आकर्षणाचे केंद्र ठरले होते. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून शहर परिसरात मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागात पंजे मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली. गांधीनगर, आझादनगर, खंजर गल्ली, काकतीवेस, कलईगार गल्ली, कांदा मार्केट आदी ठिकाणी पंजांची मिरवणूक काढून ताबूत भेटीचा कार्यक्रम पार पडला. शहराच्या विविध भागातून आलेल्या ताबूत व पंजांची भेट झाल्यानंतर मुस्लीम बांधवांतर्फे एकमेकाला शुभेच्छा देऊन मोहरम सण साजरा करण्यात आला. यानंतर सायंकाळी किल्ला तलावामार्गे पंजा आणि ताबूत मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.