मृणाल हेब्बाळकर यांचा शहर परिसरात प्रचाराचा धडाका
काँग्रेस पक्षाला साथ द्या : आमदार चन्नराज हट्टीहोळी
बेळगाव : बेळगाव उत्तर आणि बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील अनेक भागात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी, आमदार राजू सेठ यांनी जोरदार प्रचार करून मतदारांना काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. राज्य सरकारकडून जनहिताच्या योजना राबविल्या जात असून सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे कल्याण साधले जात आहे. गरिबांच्या कल्याणासाठी गॅरंटी योजना जारी करण्यात आल्या असून मतदारांनी मृणाल हेब्बाळकरांना विजयी करावे, असे आवाहन आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी येथे केले. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या टेंगीनकेरा गल्ली, नेहरूनगर, अशोकनगर, गांधीनगर, दीपक गल्ली, दीपक कॉलनी या ठिकाणी प्रचार करण्यात आला. यावेळी मतदारांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांचे जंगी स्वागत करून उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. गरिबांच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्षाला केंद्रात निवडून द्यावे. राज्यात ज्याप्रमाणे साथ देण्यात आली त्या प्रमाणेच केंद्रामध्ये सत्ता आणण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास अनेक गॅरंटी योजना राबविल्या जाणार आहेत. महिलांना 1 लाख रुपये, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, रोजगार आदी विकासाभिमुख योजना राबवून गोरगरिबांचे कल्याण साधले जाणार आहे. देशाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्यात यावा. बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना विजयी करण्यात यावे, असे आवाहन आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी केले. यावेळी एपीएमसी माजी अध्यक्ष शिवनगौडा पाटील, राजशेखर तळवार, निखिल, मॅलकोटे, अमन सेठ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी मृणाल हेब्बाळकर यांचा शहर परिसरात प्रचाराचा धडाका
मृणाल हेब्बाळकर यांचा शहर परिसरात प्रचाराचा धडाका
काँग्रेस पक्षाला साथ द्या : आमदार चन्नराज हट्टीहोळी बेळगाव : बेळगाव उत्तर आणि बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील अनेक भागात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी, आमदार राजू सेठ यांनी जोरदार प्रचार करून मतदारांना काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. राज्य सरकारकडून जनहिताच्या योजना राबविल्या जात असून सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे कल्याण साधले जात आहे. गरिबांच्या कल्याणासाठी […]