मृणाल हेब्बाळकर यांच्याकडून नेहा हिरेमठच्या हत्येचा निषेध

बेळगाव : हुबळी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिची झालेली हत्या अत्यंत निंदणीय घटना आहे. याचा आपण तीव्र निषेध करतो, असे बेळगाव काँग्रेस पक्षाचे लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले. हिरेमठ कुटुंबीयांवर ओढवलेल्या दु:खामध्ये आपण सर्व कुटुंबीय सहभागी आहोत. आपल्या आई मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हिरेमठ कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करून धैर्य दिले आहे. अशा […]

मृणाल हेब्बाळकर यांच्याकडून नेहा हिरेमठच्या हत्येचा निषेध

बेळगाव : हुबळी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिची झालेली हत्या अत्यंत निंदणीय घटना आहे. याचा आपण तीव्र निषेध करतो, असे बेळगाव काँग्रेस पक्षाचे लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले. हिरेमठ कुटुंबीयांवर ओढवलेल्या दु:खामध्ये आपण सर्व कुटुंबीय सहभागी आहोत. आपल्या आई मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हिरेमठ कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करून धैर्य दिले आहे. अशा घटना समाजात पुन्हा घडू नयेत, यासाठी या घटनेमागे असणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी. भविष्यामध्ये असे कृत्य करण्यास कोणीही पुढे येणार नाही, अशी शिक्षा आरोपीला देण्यात यावी. आपण सर्वजण दु:खी हिरेमठ कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. या घटनेचे राजकारण केले जाऊ नये, असे आवाहन मृणाल हेब्बाळकर यांनी केले.