खासदार विशाल पाटील आज संसदेत शपथ घेणार! दादा घराण्यातील सहावे खासदार

सांगली प्रतिनिधी सांगलीचे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार विशाल प्रकाशबापू पाटील हे मंगळवारी 25 जून रोजी संसद भवनामध्ये खासदारकीची शपथ घेणार आहेत. खासदारपदाची शपथ घेणारे वसंतदादा पाटील घराण्यातील ते सहावे सदस्य आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून निवडून आल्यावर काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. विशाल पाटील यांचा […]

खासदार विशाल पाटील आज संसदेत शपथ घेणार! दादा घराण्यातील सहावे खासदार

सांगली प्रतिनिधी

सांगलीचे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार विशाल प्रकाशबापू पाटील हे मंगळवारी 25 जून रोजी संसद भवनामध्ये खासदारकीची शपथ घेणार आहेत. खासदारपदाची शपथ घेणारे वसंतदादा पाटील घराण्यातील ते सहावे सदस्य आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून निवडून आल्यावर काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. विशाल पाटील यांचा लोकसभा सदस्यपदाचा शपथविधी मंगळवारी होणार आहेत. सकाळी 11 वाजता शपथविधीचा कार्यक्रम असून त्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या लोकसभा व राज्यसभा या चॅनेलवर प्रक्षेपित होणार आहे. या शपथविधीसाठी माजी मंत्री तथा आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र प्रदेश मा†हला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजाभाभी पाटील, विशाल पाटील यांच्या पत्नी सौ. पूजा पाटील तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
दादा घराण्यातील सहावे खासदार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे घराणे 70 वर्षांहून अधिक काळ राजकारणात आहे. या घराण्याचे सदस्य विधानसभा आणि विधानपरिषदेत आमदार म्हणून आणि लोकसभा, राज्यसभेत खासदार म्हणून निवडून आले आहेत. मुख्यमंत्रीपदासह अन्य मंत्रीपदे या घराण्यातील सदस्यांनी भूषविली आहेत. यापूर्वी स्वर्गीय वसंतदादा पाटील, श्रीमती शालिनीताई पाटील, स्वर्गीय प्रकाशबापू पाटील, स्वर्गीय मदनभाऊ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील हे पाच सदस्य खासदार पदावर विराजमान होते. विशाल पाटील यांच्या रूपाने या घराण्यात सहावे खासदारपद मिळाले आहे.