खासदार प्रियांका जारकीहोळी रविवारी निपाणी दौऱ्यावर

निपाणी प्रतिनिधी गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसामुळे निपाणी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी खासदार प्रियांका जारकीहोळी या रविवारी निपाणी दौऱ्यावर येणार आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता संकेश्वर येथे पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर 12 वाजता निपाणी तालुक्यात जत्राट, 12.30 वाजता यमगर्णी, 1 वाजता हुन्नरगी आणि दुपारी 2 […]

खासदार प्रियांका जारकीहोळी रविवारी निपाणी दौऱ्यावर

निपाणी प्रतिनिधी

गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसामुळे निपाणी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी खासदार प्रियांका जारकीहोळी या रविवारी निपाणी दौऱ्यावर येणार आहेत.
रविवारी सकाळी 11 वाजता संकेश्वर येथे पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर 12 वाजता निपाणी तालुक्यात जत्राट, 12.30 वाजता यमगर्णी, 1 वाजता हुन्नरगी आणि दुपारी 2 वाजता सिदनाळ येथे भेट देऊन पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आजी-माजी लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित असणार आहेत, अशी माहिती जिल्हा काँग्रेस आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली.