खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी घेतली आमदार राजू सेठ यांची भेट
बेळगाव : चिकोडीच्या नवनिर्वाचित काँग्रेस खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी नुकतीच बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांची त्यांच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी राजू सेठ यांनी प्रियांका जारकीहोळी यांचा सत्कार केला. याप्रसंगी मुस्लीम समुदायातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान वयात जनसेवेची संधी प्रियांका जारकीहोळी यांना चिकोडी लोकसभा मतदारसंघातील जनतेने दिली आहे. सतीश जारकीहोळी यांच्याप्रमाणे राजकारणात प्रियांका यांनी कामगिरी करावी, अशी सदिच्छा आमदार राजू सेठ यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना आमदार राजू सेठ यांनी, मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याप्रमाणेच खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी सर्व समुदायांच्या प्रगतीसाठी परिश्रम घ्यावेत, असा सल्ला दिला. याप्रसंगी नगरसेवक रवी साळुंखे, मुजम्मील डोणी, रियाज किल्लेदार, सिद्धार्थ भातकांडे, बसवराज मोदगेकर, अस्मिता पाटील, लक्ष्मी लोकरी, इक्रा मुल्ला, माया कडोलकर, शाहीदखान पठाण, शिवाजी मंडोळकर, बाबाजान मतवाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी घेतली आमदार राजू सेठ यांची भेट
खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी घेतली आमदार राजू सेठ यांची भेट
बेळगाव : चिकोडीच्या नवनिर्वाचित काँग्रेस खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी नुकतीच बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांची त्यांच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी राजू सेठ यांनी प्रियांका जारकीहोळी यांचा सत्कार केला. याप्रसंगी मुस्लीम समुदायातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान वयात जनसेवेची संधी प्रियांका जारकीहोळी यांना चिकोडी लोकसभा मतदारसंघातील जनतेने दिली आहे. सतीश […]