खासदार जगदीश शेट्टर यांची सांबरा विमानतळाला भेट

विकासकामांबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा कऊन घेतला आढावा बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी येथील सांबरा विमानतळाला भेट देवून विमानतळाच्या विकास कामांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विमानतळाच्या विकासकामांचा आढावा घेतला. विमानतळाच्या विकासासाठी विमानयान प्राधिकारण विकास योजनांसह राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या प्रलंबित विकासकामांची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन विकास कामे राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. 322 कोटी रुपये अनुदानातून डोमॅस्टीक […]

खासदार जगदीश शेट्टर यांची सांबरा विमानतळाला भेट

विकासकामांबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा कऊन घेतला आढावा
बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी येथील सांबरा विमानतळाला भेट देवून विमानतळाच्या विकास कामांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विमानतळाच्या विकासकामांचा आढावा घेतला. विमानतळाच्या विकासासाठी विमानयान प्राधिकारण विकास योजनांसह राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या प्रलंबित विकासकामांची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन विकास कामे राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. 322 कोटी रुपये अनुदानातून डोमॅस्टीक टर्मिनलची उभारणी करण्यात येत आहे. विमानतळाच्या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची व योजनांची पाहणी करुन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विमानतळ व्यवस्थापक एस. त्यागराजन, डीजीएम पी. एस. देसाई यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते.