राज्यात 31 मे रोजी मान्सूनचा प्रवेश

प्रतिनिधी/ बेंगळूर राज्यात मान्सूनपूर्व पावसाने शेतकरीवर्ग सुखावला आहे. दरम्यान, हवामान खात्याने राज्यातील जनतेला खूशखबर दिली आहे. नैर्त्रुत्य मान्सून केरळमार्गे 31 मे रोजी राज्यात दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी मान्सूनच्या अभावामुळे कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. मात्र, यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज असल्याने राज्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. […]

राज्यात 31 मे रोजी मान्सूनचा प्रवेश

प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने शेतकरीवर्ग सुखावला आहे. दरम्यान, हवामान खात्याने राज्यातील जनतेला खूशखबर दिली आहे. नैर्त्रुत्य मान्सून केरळमार्गे 31 मे रोजी राज्यात दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी मान्सूनच्या अभावामुळे कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. मात्र, यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज असल्याने राज्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मान्सून 2 किंवा 3 जून रोजी कर्नाटकाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांत व्यापणार आहे. यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.