पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पैसे मिळतातच यूपीतील 11 महिला प्रियकरासह गायब! शोध सुरु DUDA ने नोटीस बजावले
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत गरीब आणि मध्यमवर्गीय कुटूंबांना कायमस्वरूपी घरे बांधण्यासाठी सरकार कडून आर्थिक मदत दिली जाते.
सरकार या योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांचे अनुदान देते. या योजने अंतर्गत पात्र महिलेच्या नावे निधी देण्यात येतो. या योजनेअंतर्गत काही अनियमितता किंवा त्रुटी आढळ्यास पैसे परत घेतले जातात.
युपीच्या महाराजगंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील निचलौल ब्लॉकमध्ये राहणाऱ्या 11 महिला आपल्या प्रियकरासह पळून गेल्या
या महिलांच्या खात्यात पंतप्रधान आवास योजनेचे 40 हजार रुपये जमा झाले होते. पैसे मिळाल्यावर त्या पसार झाल्या. ही बाब उघडकीस आल्यावर महिलांच्या पती ने पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला.अधिकारी या 11 महिलांचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सरकारकडून 40 हजार रुपयांचा पहिला हफ्ता दिला गेला. महिला पतीला सोडून आपल्या प्रियकराच्या पळून गेल्या.
हे प्रकरण समजल्यावर महिलांच्या पतीने पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. नंतर अधिकाऱ्यांनी या योजनेचा दुसरा हफ्ता रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
Edited by – Priya Dixit