मोहन मोरे, नील बॉईज हिंडलगा विजयी

साईराज चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित नव्या साईराज चषक ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळून झालेल्या सामन्यातून मोहन मोरे ,नील बॉईज हिंडलगा, स्टार चंदगड संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. करण मोरे, शिवाजी पाडळकर, सागर कांबळे, योगेश म्हात्रे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला व्हॅक्सीन डेपो मैदानावरती खेळविण्यात झालेल्या पहिल्या सामन्यात दडी स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 76 धावा केल्या. दिग्विजय पाटीलने 4 चौकारासह 29 धावा केल्या. मोहन मोरे तर्फे अनिकेत रवीने 2 गडी बाद केले. प्रतिउत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाने 5.2 षटकात 2 गडी बात 80 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात करण मोरेने 5 षटकार 4 चौकारांसह नाबाद 54 धावा करीत अर्धशतक झळकविले. दुसऱ्या सामन्यात ग्रामीण स्पोर्ट्स कल्लेहोळने प्रथम फलंदाजी करताना 7 षटकात सर्वगडी बाद 54 धावा केल्या. त्यात भूषणने 16 धावा केल्या. चंदगड तर्फे सुरजने 4 धावात 3, तानाजीने 8 धावात 3 तर राहुलने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना स्टार चंदगडने 3.5 षटकात बिनबाद 60 धावा करून सामना दहा गड्यांनी जिंकला. त्यात शिवाजी पाडळकरने नाबाद 43, मुजमीलने 14 धावा केल्या.तिसऱ्या सामन्यात नील बॉईज हिंडलगाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 128 धावा केल्या. त्यात योगेश मात्रेने 8 षटकार सह नाबाद 61 धावा. करण धुलेने 3 षटकारसहं 26 धावा केल्या. पॅरि स्पोर्ट्स तर्फे अभी, सागर, चैतन्य यांनी प्रत्येकी एक गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पॅरि स्पोर्ट्स s8 षटकात 7 गडी बाद 42 धावा केल्या. विकी व मंजू यानी प्रत्येकी 11 धावा केल्या. नील बॉइज तर्फे किरण पाटील, किरण धुले यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात चंदगडने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 58 धावा केल्या. त्यात मयूर करंडेने 3 षटकारसह 30 धावा केल्या. मोहन मोरे तर्फे सागर कांबळेने 3, देसाई व फिरोज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरेने 4.2 षटकात 3 गडी बाद 64 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात करण मोरेने 28, प्रशांतने 13 धावा केल्या. चंदगडतर्फे रणजीतने 2 तर मयूर ने 1 गडी बाद केला.

Home महत्वाची बातमी मोहन मोरे, नील बॉईज हिंडलगा विजयी
मोहन मोरे, नील बॉईज हिंडलगा विजयी
साईराज चषक क्रिकेट स्पर्धा बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित नव्या साईराज चषक ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळून झालेल्या सामन्यातून मोहन मोरे ,नील बॉईज हिंडलगा, स्टार चंदगड संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. करण मोरे, शिवाजी पाडळकर, सागर कांबळे, योगेश म्हात्रे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला व्हॅक्सीन डेपो मैदानावरती […]
