पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानपदी मोहम्मद मुस्तफा
माजी पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या 18 दिवसांनी नियुक्ती
वृत्तसंस्था/ वेस्ट बँक
मोहम्मद मुस्तफा हे पॅलेस्टाइनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. अध्यक्ष महमूद अब्बास यांनी मुस्तफा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती माजी पंतप्रधान मोहम्मद सातायेह समवेत पूर्ण सरकारने राजीनामा दिल्याच्या 18 दिवसांनी झाली आहे.
पॅलेस्टाइन अथॉरिटीचा अध्यक्ष हाच संबंधित क्षेत्राचा प्रमुख असतो. अध्यक्षाची निवड वेस्ट बँक आणि पूर्व जेरूसलेममध्ये लोकशाहीच्या मार्गाने होते. सद्यकाळात महमूद अब्बास हे अध्यक्ष आहेत. 2005 पासून ते पॅलेस्टाइन अथॉरिटीचे नेतृत्व करत आहेत. अध्यक्षांकडून पंतप्रधानांची नियुक्ती केली जाते. परंतु याकरता स्थानिक प्रतिनिधिगृहाच्या मंजुरीची आवश्यकता भासते.
गाझावर 2014 मध्ये इस्रायलने केलेल्या कारवाईनंतर मुस्तफा यांनीच गाझाच्या पुनउ&भारणीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. पॅलेस्टाइन अथॉरिटीचे ते आर्थिक सल्लागार देखील राहिले आहेत. पॅलेस्टाइन इन्व्हेस्टमेंट फंडच्या बोर्डाचे ते सदस्य देखील होते. याचबरोबर जागतिक बँकेत त्यांनी वरिष्ठ पदावर काम केले आहे. पंतप्रधान झाल्यावर मुस्तफा यांना सर्वप्रथम मंत्रिमंडळाची स्थापना करावी लागणार आहे.
मोहम्मद सातायेह यांनी 26 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. गाझापट्टीत पॅलेस्टिनी लोक उपासमारीला तोंड देत असून तेथे सातत्याने इस्रायलकडुन हल्ले केले जात आहेत. वेस्ट बँक आणि जेरूसलेममध्ये देखील हिंसा वाढतेय, हे पाहता राजीनामा दिला असल्याचा दावा सातायेह यांनी केला होता.
Home महत्वाची बातमी पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानपदी मोहम्मद मुस्तफा
पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानपदी मोहम्मद मुस्तफा
माजी पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या 18 दिवसांनी नियुक्ती वृत्तसंस्था/ वेस्ट बँक मोहम्मद मुस्तफा हे पॅलेस्टाइनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. अध्यक्ष महमूद अब्बास यांनी मुस्तफा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती माजी पंतप्रधान मोहम्मद सातायेह समवेत पूर्ण सरकारने राजीनामा दिल्याच्या 18 दिवसांनी झाली आहे. पॅलेस्टाइन अथॉरिटीचा अध्यक्ष हाच संबंधित क्षेत्राचा प्रमुख असतो. अध्यक्षाची निवड वेस्ट बँक आणि […]
