जिल्हाधिकारीपदी मोहम्मद रोशन

पदभार स्वीकारला : नितेश पाटील यांची बेंगळूरला बदली बेळगाव : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर मोहम्मद रोशन यांची नियुक्ती झाली असून शुक्रवारी सकाळी नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. मोहम्मद रोशन हे 2015 बॅचचे आयएएस अधिकारी असून बेळगावला बदली होण्यापूर्वी  हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर ते कार्यरत होते. बीटेक व एमबीए (फायनान्स), एमए (पब्लिक पॉलिसी)चे पदवीधर असणारे मोहम्मद रोशन यांनी […]

जिल्हाधिकारीपदी मोहम्मद रोशन

पदभार स्वीकारला : नितेश पाटील यांची बेंगळूरला बदली
बेळगाव : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर मोहम्मद रोशन यांची नियुक्ती झाली असून शुक्रवारी सकाळी नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. मोहम्मद रोशन हे 2015 बॅचचे आयएएस अधिकारी असून बेळगावला बदली होण्यापूर्वी  हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर ते कार्यरत होते. बीटेक व एमबीए (फायनान्स), एमए (पब्लिक पॉलिसी)चे पदवीधर असणारे मोहम्मद रोशन यांनी यापूर्वी हावेरी, कारवार जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.
नितेश पाटील हे गेल्या दोन वर्षांपासून बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. बेंगळूर येथील लघु व मध्यम उद्योग खात्याच्या संचालकपदी त्यांची वर्णी लागली आहे. गुरुवारी रात्री राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जाहीर झाला. शुक्रवारी सकाळी नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. नितेश पाटील यांनी मोहम्मद रोशन यांच्याकडे सूत्रे सोपविली. यावेळी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीणा, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आदी उपस्थित होते.