खराब हवामानामुळे मोदींचा भूतान दौरा रद्द

वृत्तसंस्था /नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भूतानचा प्रस्तावित दौरा खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आला असून दोन्ही देश नवीन तारखांवर विचार करत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 मार्च रोजी शेजारील देश भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार होते. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे नुकतेच पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असता त्यांनी पंतप्रधान मोदींना भूतानमध्ये […]

खराब हवामानामुळे मोदींचा भूतान दौरा रद्द

वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भूतानचा प्रस्तावित दौरा खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आला असून दोन्ही देश नवीन तारखांवर विचार करत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 मार्च रोजी शेजारील देश भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार होते. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे नुकतेच पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असता त्यांनी पंतप्रधान मोदींना भूतानमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, आता पारो विमानतळावरील खराब हवामानामुळे पंतप्रधानांचा दौरा अंतिमक्षणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. भारत आणि भूतान यांच्यात अनोखी आणि चिरस्थायी भागिदारी आहे. ही भागिदारी परस्पर विश्वास, समजूतदारपणा आणि सद्भावनेत ऊजलेली आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.