अनिवासी भारतीयांसाठी मोदींचा विजय फायदेशीर : डॉ.दातार

मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीचे सरकार तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापना करत आहे. ही घडामोड विशेषत: अनिवासी भारतीय समुदायासाठी आनंददायी आहे, असे मत अदिल ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्सचे (दुबई) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांनी मांडले आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गेल्या दहा वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारताची प्रतिमा जागतिक पातळीवर उज्ज्वल […]

अनिवासी भारतीयांसाठी मोदींचा विजय फायदेशीर : डॉ.दातार

मुंबई :
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीचे सरकार तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापना करत आहे. ही घडामोड विशेषत: अनिवासी भारतीय समुदायासाठी आनंददायी आहे, असे मत अदिल ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्सचे (दुबई) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांनी मांडले आहे.
नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गेल्या दहा वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारताची प्रतिमा जागतिक पातळीवर उज्ज्वल आणि मैत्रीपूर्ण बनवली आहे. त्याचा फायदा विदेशातील भारतीयांना होत आहे. भारतीयांना पूर्वीपेक्षा अधिक सौजन्यशील व आदराची वागणूक मिळत आहे. आम्ही संयुक्त अरब अमिरात व आखाती देशांमध्ये याचा अनुभव घेत आहोत. आदरणीय मोदींच्या तिसऱ्या कारकीर्दीत भारतीय व्यापार, उद्योग व अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक जोमाने चालना मिळेल, यात शंका नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.