पंजाबची 15 वर्षीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्माला मोदींची शाबासकी
वृत्तसंस्था/ होशियारपूर (पंजाब)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मधील बॅडमिंटन स्पर्धांत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंजाबमधील 15 वर्षीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्माचे कौतुक केले आहे. शर्माने मलेशियामध्ये झालेल्या वरिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. तन्वीला लिहिलेल्या पत्रात मोदींनी संपूर्ण देशाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत या युवा खेळाडूचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
भारताच्या क्रीडा प्रतिभेबद्दल अभिमान व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम’सारख्या उपक्रमांद्वारे खेळाडूंना आधार देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला आहे. या प्रयत्नांचे उद्दिष्ट भारतीय क्रीडापटूंना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करणे तसेच जागतिक प्रशिक्षण कौशल्यांचा लाभ मिळवून देणे आणि त्याद्वारे त्यांना उच्च स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम करणे हे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
पंतप्रधानांनी तऊण पिढीच्या दृष्टीने तन्वीच्या प्रेरणादायी भूमिकेवर भर दिला आहे आणि तिचे यश नि:संशयपणे देशभरातील असंख्य होतकरू खेळाडूंना प्रेरित करेल, असे म्हटले आहे. ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम’सारख्यासारख्या उपक्रमांबद्दल जागऊकता वाढवून आणि क्रीडा क्षेत्रातील संधींना प्रकाशात आणून तन्वीचे यश केवळ क्रीडा संस्कृतीच्या भरभराटीत योगदान देत नाही, तर फिट इंडिया चळवळीलाही हातभार लावते, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांकडून पत्र मिळाल्यावर आपल्या भावना मांडताना तन्वी शर्माने आपल्याला वाटलेला अपार अभिमान आणि आनंद व्यक्त केला आहे. या पत्रामुळे आपला सन्मान झाल्याचे आणि मोठी सिद्धी मिळविल्याचे आपल्याला वाटते, असे तन्वीने म्हटले आहे. या पत्राचे वर्णन तिने आपल्या कठोर परिश्रमांचे आणि बॅडमिंटनमधील समर्पणाचे प्रतीक असे केले आहे आणि या खेळात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Home महत्वाची बातमी पंजाबची 15 वर्षीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्माला मोदींची शाबासकी
पंजाबची 15 वर्षीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्माला मोदींची शाबासकी
वृत्तसंस्था/ होशियारपूर (पंजाब) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मधील बॅडमिंटन स्पर्धांत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंजाबमधील 15 वर्षीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्माचे कौतुक केले आहे. शर्माने मलेशियामध्ये झालेल्या वरिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. तन्वीला लिहिलेल्या पत्रात मोदींनी संपूर्ण देशाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत या […]