मॉडेल तानिया सिंहची आत्महत्या, आयपीएल स्टार अडचणीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आयपीएल फ्रेंचाइजी सनरायजर्स हैदराबादचा क्रिकेटपटू अभिषेक शर्मा आता एका आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आला आहे. सूरत येथील प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंहच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अभिषेकला चौकशीसाटी समन्स बजावला आहे. तानियाने अखेरचा कॉल अभिषेक शर्माला केला होता असे प्रारंभिक तपासात दिसून आले आहे. 20 फेब्रुवारी रोजी म्हणजेच मंगळवारी रात्री उशिरा तानियाने स्वत:च्या घरात आत्महत्येसारखे टोकाचे […]

मॉडेल तानिया सिंहची आत्महत्या, आयपीएल स्टार अडचणीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयपीएल फ्रेंचाइजी सनरायजर्स हैदराबादचा क्रिकेटपटू अभिषेक शर्मा आता एका आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आला आहे. सूरत येथील प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंहच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अभिषेकला चौकशीसाटी समन्स बजावला आहे. तानियाने अखेरचा कॉल अभिषेक शर्माला केला होता असे प्रारंभिक तपासात दिसून आले आहे.
20 फेब्रुवारी रोजी म्हणजेच मंगळवारी रात्री उशिरा तानियाने स्वत:च्या घरात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. तानिया जवळपास दोन वर्षांपासून फॅशन डिझाइनिंग आणि मॉडेलिंग करत होती. तिने आत्महत्या केल्यावर पोलिसांनी चौकशीदरम्यान तिचा फोन तपासून पाहिला. यादरम्यान तानियाने अखेरचा कॉल अभिषेक शर्माला केला होता असे स्पष्ट झाले. याच आधारावर पोलिसांनी अभिषेकला चौकशीसाठी बोलाविले आहे. प्रेमप्रकरणातून तानियाने आत्महत्या केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. अभिषेक शर्मा हा सनरायजर्स हैदराबाद संघाचा सदस्य आहे. आयपीएलमधील 47 सामने तो खेळला आहे.