मोबाईल ब्लड व्हॅन सक्रिय
अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्त रक्त संकलन
बेळगाव : अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त शहरात सोमवारी विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. धार्मिक कार्यक्रमांबरोबर रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तभांडार विभागाकडूनदेखील रक्त संकलनासाठी मोबाईल ब्लड व्हॅन उपलब्ध करण्यात आली होती. याद्वारे रक्तदात्यांमध्ये जागृती करून रक्तसंकलन करण्यात आले. या फिरत्या ब्लड व्हॅनद्वारे रस्त्यावर ये-जा करणाऱ्या इच्छुकांकडून रक्त संकलन करण्यात आले. त्यामुळे रक्तदात्यांनाही सोयीस्कर झाले. रुग्णांना वेळेत रक्ताचा पुरवठा व्हावा, यासाठी सिव्हिलच्या रक्तभांडार विभागाकडून मोबाईल ब्लड व्हॅन सक्रिय केले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातील विविध भागात सोमवारी रक्तसंकलन केले आहे. या वाहनाद्वारे रक्तदात्यांच्या घरापर्यंत जाऊन रक्तसंकलन करता येते.
Home महत्वाची बातमी मोबाईल ब्लड व्हॅन सक्रिय
मोबाईल ब्लड व्हॅन सक्रिय
अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्त रक्त संकलन बेळगाव : अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त शहरात सोमवारी विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. धार्मिक कार्यक्रमांबरोबर रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तभांडार विभागाकडूनदेखील रक्त संकलनासाठी मोबाईल ब्लड व्हॅन उपलब्ध करण्यात आली होती. याद्वारे रक्तदात्यांमध्ये जागृती करून रक्तसंकलन करण्यात आले. या फिरत्या ब्लड व्हॅनद्वारे रस्त्यावर ये-जा करणाऱ्या इच्छुकांकडून […]
