आरोस – न्हावेली – मळेवाड मतदार संघात मनसेला सुरुंग !
पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
न्हावेली / वार्ताहर
मनसेचे माजी सावंतवाडी शहर अध्यक्ष आणि मनसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी काल तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यानंतर त्याचे पडसाद आता सावंतवाडी तालुका संघटनेत उमटू लागले आहेत. आरोस मळेवाड मतदार संघातील सावंतवाडी माजी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक नंदू परब, शाखा अध्यक्ष प्रविण आरोसकर, न्हावेली शाखाअध्यक्ष सुनील नाईक ,मुकुंद धारगकर, सुजय नाईक, यांच्यासह विभागातील 30 कार्यकर्त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनाही पक्षातील गटबाजी, चुकीच्या नेमणुका त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे गुंडाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आपलीच वैयक्तिक प्रॉपर्टी असल्यासारखं वागून चुकीच्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या कुजक्या राजकारणाला कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र केल्याचे म्हटले आहे.
Home महत्वाची बातमी आरोस – न्हावेली – मळेवाड मतदार संघात मनसेला सुरुंग !
आरोस – न्हावेली – मळेवाड मतदार संघात मनसेला सुरुंग !
पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा न्हावेली / वार्ताहर मनसेचे माजी सावंतवाडी शहर अध्यक्ष आणि मनसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी काल तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यानंतर त्याचे पडसाद आता सावंतवाडी तालुका संघटनेत उमटू लागले आहेत. आरोस मळेवाड मतदार संघातील सावंतवाडी माजी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक नंदू परब, शाखा अध्यक्ष प्रविण आरोसकर, न्हावेली शाखाअध्यक्ष सुनील नाईक […]
