मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्क सुरळीत
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वेधले होते अधिकाऱ्यांचे लक्ष
न्हावेली / वार्ताहर
मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्क नसल्याने ग्राहक हैराण झाले होते. अर्धा अर्धा तास नेटवर्क नसल्याने ग्राहकाने मारलेले रिचार्ज फुकट जात होते.याबाबत जाब विचारण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर,उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ,तालुकाध्यक्ष मिलींद सावंत,विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत,विभागअध्यक्ष राकेश परब आदी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.उपस्थित बीएसएनएल आणि ट्रासफार्मर बदलण्यास दिरंगाई केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती.त्यावेळी मनसेच्या एका भेटीनंतर लगेच दोन दिवसात ट्रान्सफॉर्मर बदलून दिला.त्यामुळे बीएसएनएल नेटवर्क सेवा सुरळीत सुरु झाली आहे.यामुळे मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल ग्राहकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत .
Home महत्वाची बातमी मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्क सुरळीत
मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्क सुरळीत
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वेधले होते अधिकाऱ्यांचे लक्ष न्हावेली / वार्ताहर मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्क नसल्याने ग्राहक हैराण झाले होते. अर्धा अर्धा तास नेटवर्क नसल्याने ग्राहकाने मारलेले रिचार्ज फुकट जात होते.याबाबत जाब विचारण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर,उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ,तालुकाध्यक्ष मिलींद सावंत,विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत,विभागअध्यक्ष राकेश परब आदी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.उपस्थित बीएसएनएल आणि ट्रासफार्मर बदलण्यास दिरंगाई […]