महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : राज ठाकरेंची भाजपकडे 20 जागांची मागणी?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयाने खूश झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महायुती आघाडीला पाठिंबा दिला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत ठसा उमटवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मनसेने भाजपशी चर्चा सुरू केली आहे. मनसेने राज्यात विधानसभेच्या 20 जागांची मागणी केल्याची चर्चा आहे. यापैकी बहुतांश जागा मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) आहेत. मनसेने मागितलेल्या जागांमध्ये वरळी, दादर-माहीम, शिवरी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, औरंगाबाद मध्य, पुणे आणि  एका जागेचा समावेश आहे.  शिवसेनेला (UBT) टक्कर देण्याचे राज ठाकरेंचे उद्दिष्ट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी विधानसभा मतदारसंघात मनसे प्रमुख त्यांचे विश्वासू संदीप देशपांडे यांना   शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उभे करण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेचे नितीन सरदेसाई दादर-माहीममधून तर शालिनी ठाकरे वर्सोव्यातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, येत्या 26 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी मनसे भाजपला आव्हान देण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी मनसेने मराठी चित्रपट निर्माते आणि पक्षाचे नेते अभिजित पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. दरम्यान, विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मी कुणाच्याही दारात जागा मागायला जाणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिले आहेत. तर उद्धव ठाकरेंविषयी जनतेच्या मनात राग आहे. त्यांना मराठी माणसांनी नव्हे, तर मुस्लिम समाजाने मत दिल्याचंही राज ठाकरे म्हणाले. महायुती किंवा महाविकास आघाडीचं जागावाटप काही ठरत नाही. मी कुणाच्याही दारात जागा मागायला जाणार नाही, कुणाशीही जागावाटपाची चर्चा करणार नाही. आपल्याला विधानसभेच्या 200 ते 225 जागांवर निवडणूक लढवायची आहे, असे ते म्हणाले. लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी राग आहे. उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मराठी माणसाचं नाही. मराठी मतदार आपली वाट बघतोय. ठाकरेंना झालेलं मतदान हे मोदी विरोधातील मतदान आहे. उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचं मतदान झालं, अशा शब्दात राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्ते-पदाधिकारी यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं. राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना मतदारसंघांचं वाटप केलं आहे. वरळीत राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे पोस्टर संदीप देशपांडे यांनी लावल्याने ते आदित्य ठाकरेंविरुद्ध या मतदारसंघातून उतरणार असल्याची चर्चा आहे. तर बाळा नांदगावकर शिवडीतून लढण्याची चिन्हं आहेत.हेही वाचा अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवालविजय मिळूनही नवी मुंबईत शिवसेना-भाजप युतीसाठी धोक्याची घंटा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : राज ठाकरेंची भाजपकडे 20 जागांची मागणी?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयाने खूश झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महायुती आघाडीला पाठिंबा दिला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत ठसा उमटवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मनसेने भाजपशी चर्चा सुरू केली आहे. मनसेने राज्यात विधानसभेच्या 20 जागांची मागणी केल्याची चर्चा आहे. यापैकी बहुतांश जागा मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) आहेत.मनसेने मागितलेल्या जागांमध्ये वरळी, दादर-माहीम, शिवरी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, औरंगाबाद मध्य, पुणे आणि  एका जागेचा समावेश आहे. शिवसेनेला (UBT) टक्कर देण्याचे राज ठाकरेंचे उद्दिष्ट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी विधानसभा मतदारसंघात मनसे प्रमुख त्यांचे विश्वासू संदीप देशपांडे यांना   शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उभे करण्याची शक्यता आहे.दरम्यान, मनसेचे नितीन सरदेसाई दादर-माहीममधून तर शालिनी ठाकरे वर्सोव्यातून निवडणूक लढवणार आहेत.मात्र, येत्या 26 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी मनसे भाजपला आव्हान देण्यासाठी सज्ज झाली आहे.आगामी निवडणुकीसाठी मनसेने मराठी चित्रपट निर्माते आणि पक्षाचे नेते अभिजित पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे.दरम्यान, विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मी कुणाच्याही दारात जागा मागायला जाणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिले आहेत. तर उद्धव ठाकरेंविषयी जनतेच्या मनात राग आहे. त्यांना मराठी माणसांनी नव्हे, तर मुस्लिम समाजाने मत दिल्याचंही राज ठाकरे म्हणाले.महायुती किंवा महाविकास आघाडीचं जागावाटप काही ठरत नाही. मी कुणाच्याही दारात जागा मागायला जाणार नाही, कुणाशीही जागावाटपाची चर्चा करणार नाही. आपल्याला विधानसभेच्या 200 ते 225 जागांवर निवडणूक लढवायची आहे, असे ते म्हणाले.लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी राग आहे. उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मराठी माणसाचं नाही. मराठी मतदार आपली वाट बघतोय. ठाकरेंना झालेलं मतदान हे मोदी विरोधातील मतदान आहे. उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचं मतदान झालं, अशा शब्दात राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्ते-पदाधिकारी यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं.राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना मतदारसंघांचं वाटप केलं आहे. वरळीत राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे पोस्टर संदीप देशपांडे यांनी लावल्याने ते आदित्य ठाकरेंविरुद्ध या मतदारसंघातून उतरणार असल्याची चर्चा आहे. तर बाळा नांदगावकर शिवडीतून लढण्याची चिन्हं आहेत.हेही वाचाअजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल
विजय मिळूनही नवी मुंबईत शिवसेना-भाजप युतीसाठी धोक्याची घंटा

Go to Source