आकुर्ली मेट्रो स्थानकाचा प्रवास होणार सुखकर

दहिसर-गुंडावली मेट्रो 7 वरील पश्चिम द्रुतगती मार्ग (western express highway) ते आकुर्ली मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास करणे सध्या प्रवाशांसाठी अडचणीचे ठरत आहे. मात्र आता त्यांचा आकुर्ली स्थानकापर्यंतचा प्रवास लवकरच सुकर आणि सुरक्षित होणार आहे. कारण मुंबई (mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दक्षिण-उत्तर विभागाला जोडण्यासाठी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलासाठी 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या पुलाच्या बांधकामासाठी एमएमआरडीएने नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. एमएमआरडीएच्या मेट्रो (mumbai metro) प्रकल्पातील मेट्रो 7 हा प्रकल्प 16.5 किमीचा आहे. त्यात 13 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. एप्रिल 2022 मध्ये हा मार्ग अंशतः सुरु करण्यात आला आणि जानेवारी 2023 मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाला. आज या मार्गावरून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत आहेत. अशावेळी या मार्गातील पश्चिम द्रुतगती मार्गावरील स्थानकात ये-जा करणे कठीण होत आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा पूल किंवा पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना दक्षिण-उत्तर विभागात ये-जा करण्यासाठी लांब वळसा घालून जावे लागते. हे लक्षात घेऊन एमएमआरडीएने (mmrda) पश्चिम द्रुतगती मार्गावरील स्थानकांना पादचारी पुलाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या मार्गावर 14 पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. 210 कोटी रुपये खर्च करून टप्प्याटप्प्याने हे पूल बांधले जात आहेत. त्यानुसार एमएमआरडीएने शुक्रवारी आकुर्ली मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील पादचारी पुलाच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. निविदेनुसार, पश्चिम द्रुतगती मार्गाचा दक्षिण-उत्तर विभाग आकुर्ली मेट्रो स्थानकाशी पादचारी पुलाने जोडला जाईल. जेणेकरून पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दक्षिण-उत्तर विभागातील प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे ठरेल. या पादचारी पुलासाठी 40 कोटी 59 लाख 43 हजार 703 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच या पुलाच्या बांधकामासाठी 18 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे, हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.हेही वाचा गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी 5 वर्षांची परवानगी चिंचपोकळी स्टेशनचा कायापालट होणार

आकुर्ली मेट्रो स्थानकाचा प्रवास होणार सुखकर

दहिसर-गुंडावली मेट्रो 7 वरील पश्चिम द्रुतगती मार्ग (western express highway) ते आकुर्ली मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास करणे सध्या प्रवाशांसाठी अडचणीचे ठरत आहे. मात्र आता त्यांचा आकुर्ली स्थानकापर्यंतचा प्रवास लवकरच सुकर आणि सुरक्षित होणार आहे. कारण मुंबई (mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दक्षिण-उत्तर विभागाला जोडण्यासाठी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलासाठी 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या पुलाच्या बांधकामासाठी एमएमआरडीएने नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.एमएमआरडीएच्या मेट्रो (mumbai metro) प्रकल्पातील मेट्रो 7 हा प्रकल्प 16.5 किमीचा आहे. त्यात 13 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. एप्रिल 2022 मध्ये हा मार्ग अंशतः सुरु करण्यात आला आणि जानेवारी 2023 मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाला. आज या मार्गावरून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत आहेत. अशावेळी या मार्गातील पश्चिम द्रुतगती मार्गावरील स्थानकात ये-जा करणे कठीण होत आहे.पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा पूल किंवा पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना दक्षिण-उत्तर विभागात ये-जा करण्यासाठी लांब वळसा घालून जावे लागते. हे लक्षात घेऊन एमएमआरडीएने (mmrda) पश्चिम द्रुतगती मार्गावरील स्थानकांना पादचारी पुलाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या मार्गावर 14 पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. 210 कोटी रुपये खर्च करून टप्प्याटप्प्याने हे पूल बांधले जात आहेत. त्यानुसार एमएमआरडीएने शुक्रवारी आकुर्ली मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील पादचारी पुलाच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली आहे.निविदेनुसार, पश्चिम द्रुतगती मार्गाचा दक्षिण-उत्तर विभाग आकुर्ली मेट्रो स्थानकाशी पादचारी पुलाने जोडला जाईल. जेणेकरून पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दक्षिण-उत्तर विभागातील प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे ठरेल. या पादचारी पुलासाठी 40 कोटी 59 लाख 43 हजार 703 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच या पुलाच्या बांधकामासाठी 18 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे, हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.हेही वाचागणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी 5 वर्षांची परवानगीचिंचपोकळी स्टेशनचा कायापालट होणार

Go to Source