आमदार सिल्वा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापनेवरील वाद पणजी : सां जुझे द आरियाल येथे 18 व 19 फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी करणारे निवेदन वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे. याप्रश्नी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले आहे. बेनाभाट सां जुझे द आरीयाल येथे […]

आमदार सिल्वा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापनेवरील वाद
पणजी : सां जुझे द आरियाल येथे 18 व 19 फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी करणारे निवेदन वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे. याप्रश्नी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले आहे. बेनाभाट सां जुझे द आरीयाल येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापनेवरून वाद निर्माण झाला होता. त्यासंदर्भात आमदार सिल्वा यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. सदर पुतळा बेकायदेशीररित्या उभारण्यात येत असल्याचा दावा करून स्थानिकांनी त्यास हरकत घेतली होती. त्यातून मोठा वाद निर्माण होऊन  शिवजयंती दिनी तेथे आलेले मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर स्थानिकांनी दगड, माती फेकली होती. त्यात मंत्र्यासोबतच काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते. त्या प्रकरणी नंतर मायणा कुडतरी पोलिसांनी 20 जाणांच्या विरोधात गुन्हे  नोंद केले होते. गुऊवारी सायंकाळी सां जुझे आरियल येथील ग्रामस्थांनी मेणबत्ती फेरी काढून गावात शांतता राखण्याचे आवाहन केले होते.