विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, आमदार जितेश अंतापूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश
Jitesh Raosaheb Antapurkar on X
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तसेच काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी शुक्रवारी मुंबई भाजप कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. गुरुवारीच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण हे उपस्थिती होते. अंतापूरकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांच्या जवळचे मानले जातात.
Edited By- Dhanashri Naik