आमदार आसिफ सेठ यांनी कणबर्गीत भरवला जनता दरबार
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी कणबर्गीतील सागर कॉलनी येथे रहिवाशांच्या भेटीसाठी शहर नगरपालिका येथे जनता दरबार घेतला.यावेळी रहिवाशांनी परिसरातील आरोग्य,पाणी,रस्ते,वीज,शैक्षणिक,रेशन कार्ड संदर्भातील कामे,शासकीय कार्यालयातील प्रलंबित कामे अशा विविध समस्यांचा पाढा आमदार सेठ यांच्या समोर वाचला. आमदार सेठ यांनी रहिवाशांना यावेळी संबोधित केले. ते म्हणाले की, अशा सर्व प्रकारच्या समस्यांवर प्रथम लक्ष देण्याची गरज आहे.आपण नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असून विकासाला प्राधान्य देऊ.तसेच या पुढे नागरिकांचे कोणतेही काम कोणत्याही कारणास्तव थांबणार नाही याची दक्षता घेतली जाईल.कोणत्याही कामासाठी नागरिकांनी आपल्याशी निसंकोच पणे संपर्क साधावा त्यांना सर्वतोपरी मदत,मार्गदर्शन केले जाईल असे आश्वासन आमदार आसिफ सेठ यांनी नागरिकांना दिले
Home महत्वाची बातमी आमदार आसिफ सेठ यांनी कणबर्गीत भरवला जनता दरबार
आमदार आसिफ सेठ यांनी कणबर्गीत भरवला जनता दरबार
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी कणबर्गीतील सागर कॉलनी येथे रहिवाशांच्या भेटीसाठी शहर नगरपालिका येथे जनता दरबार घेतला.यावेळी रहिवाशांनी परिसरातील आरोग्य,पाणी,रस्ते,वीज,शैक्षणिक,रेशन कार्ड संदर्भातील कामे,शासकीय कार्यालयातील प्रलंबित कामे अशा विविध समस्यांचा पाढा आमदार सेठ यांच्या समोर वाचला. आमदार सेठ यांनी रहिवाशांना यावेळी संबोधित केले. ते म्हणाले की, अशा सर्व प्रकारच्या समस्यांवर प्रथम लक्ष देण्याची गरज […]